Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
एका महिलेने पती, त्याचा मित्र आणि त्याच्या पत्नीवर वाईफ स्वॅपिंगचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

wife swapping Case : दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या पतीविरोधातच तक्रार दिली असून, तिने पतीवर गंभीर आरोप केला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीत पतीने पत्नीवर वाईफ स्वॅपिंग करण्यास दवाब टाकला. पत्नीने नकार दिल्याने तिच्याशी संबंध तोडल्याचा प्रकार उघडकीस आला.
एका महिलेने पती, त्याचा मित्र आणि त्याच्या पत्नीवर वाईफ स्वॅपिंगचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा पती तिला जबरदस्तीने दारू पाजतो आणि आधुनिक होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकतो. या गोष्टींना विरोध केल्याने पतीने संबंध तोडले.
वाचा >> Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
पीडित महिला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची रहिवासी आहे. तिचा विवाह मुरादाबाद येथील तरुणाशी झाला होता. लग्नानंतर ती नोएडा सेक्टर-137 येथील हायटेक सोसायटीत पतीच्या कुटुंबासोबत राहत होती. महिलेने 9 जून रोजी पतीसह 9 जणांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
सेक्स कधी करायचा, कधी नाही हे सासू ठरवते?
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, माझी सासू म्हणते की, तू तुझ्या पतीला आनंदी करू शकत नाहीस. पतीच्या मित्राच्या पत्नीचे नाव घेऊन ती माझ्यावर दबाव टाकते की, पतीला कसे आनंदित करावे हे तिच्याकडन शिक. त्याचबरोबर कोणत्या दिवशी पतीसोबत सेक्स करायचा आणि कधी नाही? हे सुद्धा सासूच ठरवते, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.