Modi Cabinet : निवडणूक न लढवता लागली 'लॉटरी'! 11 जण थेट मोदींच्या मंत्रिमंडळात 'मंत्री'

मुंबई तक

Modi New Cabinet 2024 : मोदींच्या मंत्रिमंडळात ११ असे मंत्री आहेत, ज्यांनी लोकसभा निवडणूकच लढवली नाही. निर्मला सीतारमन यांनी तर निवडणूक लढवण्यासही नकार दिला होता.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ११ राज्यसभा सदस्यांना संधी.
11 नेत्यांनी लढवली नाही, लोकसभा तरीही मिळाले केंद्रीय मंत्रिपद.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक न लढवलेले नेते बनले केंद्रीय मंत्री

point

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यसभेचे खासदार असलेल्यांना संधी

point

11 नेते कोण आहेत, ज्यांनी मोदींसोबत घेतली शपथ

PM Modi Cabinet 2024 Full list of Council of Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आले आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळच्या मंत्रिमंडळाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, त्यांनाही मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात 11 असे नेते आहेत, ज्यांना निवडणूक न लढवताच मंत्रिपद मिळाले आहे. (11 leader who not contested election but get cabinet berth)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तब्बल 71 मंत्र्‍यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण, यावेळी 11 असे नेते मंत्री बनले आहेत, ज्यांनी निवडणूकच लढवली नाही. 

गेल्यावेळी मंत्री असलेले, पण राज्यसभा सदस्य असलेल्या नेत्यांना भाजपने लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यापैकी अनेकजण पराभूत झाले. तर काही विजयी झाले. जिंकून आलेल्या अनेकांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं, तर नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री होते, पण यावेळी लोकसभा निवडणूक जिंकूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. 

आता लोकसभा निवडणूक न लढवता केंद्रीय मंत्री झालेले 11 नेते कोण, याबद्दल जाणून घ्या.

एस. जयशंकर 

गेल्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेल्या एस. जयशंकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी ते परराष्ट्र सचिव होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp