Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई
कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई
social share
google news

Kangana Ranaut News: नवी दिल्ली: हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्याशी चंदीगड विमानतळावर गैरवर्तन करण्यात आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपी सीआयएसएफ कॉन्स्टेबलविरुद्ध एफआयआर दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सीआयएसएफने आरोपी महिला कॉन्स्टेबलला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी, सीआयएसएफच्या तक्रारीच्या आधारे, संबंधित पोलीस स्टेशनने आरोपी महिला शिपाई कुलविंदर कौरच्या विरोधात कलम 323 आणि कलम 341 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  हे कलम जामीनपात्र असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (action intensified against kulwinder kaur who slapped kangana ranaut after suspension fir registered under 323 and 341 sections)

ADVERTISEMENT

कंगना रणौत 6 जून रोजी मंडीतून लोकसभा निवडणूक जिंकून दिल्लीला परतत असताना चंदीगड विमानतळावर ही घटना घडली. येथे सुरक्षा तपासणीनंतर महिला CISF शिपाई कुलविंदर कौरने तिला कानशिलात लगावली होती. कंगना रणौतच्या तक्रारीवरून सीआयएसएफने आरोपी महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले असून आता एफआयआरही नोंदवला आहे. या संपूर्ण घटनेच्या वेळी ज्या सीआयएसएफच्या लेडी कॉन्स्टेबलवर कंगनाने हल्ला केल्याचा आरोप केला होता, तिचे वक्तव्यही समोर आले आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, 'कंगना म्हणाली होती की, शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100-100 रुपये घेऊन बसायच्या. माझी आई पण तिथे होती...'

हे ही वाचा>> 'ही' यादी खरीच ठरली.. कोणी सांगितलेले महाराष्ट्राचे एवढे नेमके आकडे?

या घटनेनंतर कंगनाने शेअर केलेला व्हिडिओ 

आता कंगनाने कानशिलात लगावण्याच्या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली, 'मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी ठीक आहे. चंदीगड विमानतळावर आज जे घडलं ते सुरक्षा तपासणीदरम्यान घडलं. सिक्युरिटी चेक करून मी बाहेर पडताच दुसऱ्या केबिनमध्ये असलेली महिला माझी वाट बघत थांबली आणि बाजूने येऊन तिने माझ्या तोंडावर चापट मारून मला शिवीगाळ करू लागली. तेव्हा मी तिला असे का केले? असे विचारल्यावर तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगायला सुरुवात केली. पण माझी चिंता ही आहे की पंजाबमध्ये वाढत असलेला दहशतवाद आणि अतिरेकी आपण कसे हाताळणार?'

हे वाचलं का?

कंगनाच्या 4 वर्षांपूर्वीच्या ट्विटमुळे आरोपी कॉन्स्टेबलचा संताप

कंगना रणौतने 4 वर्षांपूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये कंगना रणौतने तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील 80 वर्षीय महिला शेतकऱ्याची चुकीची ओळख करून तिला बिल्किस बानो म्हटले होते. कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये एक वृद्ध महिला दिसत होती, जी वाकलेल्या अवस्थेत चालत असली तरी शेतकरी आंदोलनाचा झेंडा धरलेली दिसत होती. तिचे नाव मोहिंदर कौर होते.

हे ही वाचा>> Narendra Modi: शपथविधीची तारीख-वेळ ठरली, 'इथे' होणार सोहळा!

CISF चे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, विमानतळावर सुरक्षा पुरवणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत तिच्याविरुद्ध कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही किंवा शिक्षा झाली नाही आणि तिचा नवरा देखील त्याच विमानतळावर तैनात आहे. त्याच वेळी, ही घटना गंभीर बाब असल्याचे सांगून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी गंभीर कारवाईची मागणी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT