Bhavana Gawali : विरोध असतांनाही राणांना तिकीट मिळतं, मग भावना गवळी... वाशिममध्ये सामूहिक राजीनाम्याची तयारी
Yavatmal Washim Lok sabha,Bhavana Gawali : महायुतीच्या जागावाटपात वाशिम यवतमाळ मतदार संघाची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. गवळी यांच्या नावाला मतदार संघात कुणाचाही विरोध नाही. तरी देखील अद्याप त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही.
ADVERTISEMENT
Yavatmal Washim Lok sabha,Bhavana Gawali : जका खान, वाशिम : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र या यादीत भावना गवळी यांचे नाव नव्हते. त्यानंतर भावना गवळीचे नाव जाहीर होईल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र अर्ज भरायला अवघे 4 दिवस उरले असताना देखील अद्याप भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली नाही आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केली आहे. (bhavana gawali did not declare candidancy from yavatmal washim lok sabha constituncy shiv sainik angry ekanth shinde shiv sena mahayuti)
ADVERTISEMENT
महायुतीच्या जागावाटपात वाशिम यवतमाळ मतदार संघाची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. गवळी यांच्या नावाला मतदार संघात कुणाचाही विरोध नाही. तरी देखील अद्याप त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे भावना गवळीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
हे ही वाचा : Ajit Pawar : 'ही जागा राष्ट्रवादीची होती, पण...',
लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांना अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे वाशिमचे शिवसैनिक आक्रमक झाली असून जर भावना गवळीची उमेदवारी जाहीर झाली नाही तर आम्ही कामच करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच आज आम्ही ठराव केला आहे, जर खासदार भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर झाली नाही तर शाखाप्रमुखांपासून शिवदुत, बुथप्रमुख, गटप्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी जिल्हाप्रमुखांसह सर्व पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ, अशी भूमिका भावना गवळींच्या समर्थकांनी घेतली आहे.
हे वाचलं का?
नवनीत राणांसाठी सर्वे नाही का?
नवनीत राणा यांना विरोध असतानाही त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली होती. या ठिकाणी कुणाचाही भावना ताईंना उघड विरोध नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यामुळे कोणाचा विरोध दिसत नाही, असे देखील गवळींच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच सर्वे कुठेही विरोधात गेला नाही. सर्वे आमच्यासाठीच का? नवनीत राणांसाठी नाही का? भावना ताईंसाठी सर्वे का लावला? असा सवाल देखील कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेने नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..
दरम्यान वाशिम यवतमाळ जागेच्या उमेदवारीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वाशिम यवतमाळ मतदारसंघाचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. शिवसेनेकडे ती जागा आहे, एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे,
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT