Lok Sabha Election 2024: 'राज्यात त्यांचं काही खरं नाही'; मविआवर भाजप नेत्याचा जोरदार निशाणा! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP Leader On MVA : सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जात आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणाची नाराजी आहे तर कुणी पक्षालाच रामराम ठोकला आहे. अशावेळी टीका टिप्पण्या तर होणारच. मविआमधील सुरू असलेली धुसफूस या सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नुकतीच त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यानंतर महाविकास आघाडीत सुरू झालेल्या कुरबुरी आता चव्हाच्यावर आलेल्या आहेत. त्यांच्यातील याच वादावरून आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याने मविआवर टोला लगावला आहे. 'राज्यात महाविकास आघाडीचं काही खरं दिसत नाही', असं म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी टीका केली.

‘ही जागा मला, ती जागा मला दररोज नेते भांडतायेत' - गिरीश महाजन

भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदावरी रक्षा खडसे यांना दिली आहे. याच्या प्रचारार्थ जळगावमधील जामनेर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. भाजप नेते गिरीश महाजनही येथे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणातून महाविकास आघाडीला त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, 'ही जागा मला, ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्यांचे रोज वाद सुरू आहेत. दररोज ते भांडत आहेत.

हे वाचलं का?

खरी शिवसेना ही आपल्याकडे आहे, खरी राष्ट्रवादी ही पूर्ण आपल्याकडे आलेली आहे. 5-7 लोकं शरद पवार साहेबांकडे तर, 5-7 आमदार हे उद्धव ठाकरे साहेबांकडे उरलेले आहेत. ही जागा मला ती जागा मला यावरून महाविकास आघाडीमध्ये नेत्याचे रोज वाद सुरू आहेत. त्यांची युती आज तुटेल की उद्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.' असं म्हणत गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT