Sharad Pawar : भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? पवारांनी थेट आकडाच सांगितला
Sharad pawar's prediction On lok Sabha election 2024 : भाजप प्रणित एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याबद्दल शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चंदीगड, सूरतमधील प्रकरणावरून भाजपवर शरद पवारांची टीका
भाजपच्या लोकसभेतील यशाबद्दल पवारांचं मोठं भाकित
शरद पवारांनी मोदी-शाहांना दिले उत्तर
Sharad Pawar Prediction on lok sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला किती जागा मिळतील याबद्दल शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. पवारांनी जागांचा आकडा सांगितला आहे. इंडियन एक्स्प्रेसला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजीही व्यक्त केली. (Sharad Pawar prediction that BJP Led NDA will not get more than 230-240 Seat in the lok Sabha elections)
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी यांनी भटकती आत्मा म्हणत शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या विधानाबद्दल शरद पवार म्हणाले की, "त्यांचं संतुलन बिघडलं असावं. कारण आतापर्यंत कोणतेही पंतप्रधान अशा पद्धतीने बोलले नाहीत."
भाजप-एनडीएला किती जागा मिळतील? पवार म्हणतात...
"भाजप प्रणित एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत २३० किंवा २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही", असा राजकीय अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शिवसेनेच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट!
याबद्दल अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, "त्यांनी (मोदी सरकार) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या कारवाईमुळे पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यात संताप आहे. त्यांना दक्षिणेकडील राज्यांत किंवा पश्चिम बंगाल किंवा अल्पसंख्यांकांची मते आणि इतर मते मिळणार नाही. मला व्यक्तीशः असं वाटतं की, ते (भाजप प्रणित एनडीए) 230-240 जागा ओलांडू शकणार नाहीत."
'सूरतमध्ये जे घडलं ते बेकायदेशीर', पवारांची टीका
"भाजपने चंदीगड आणि सूरत मध्ये जे केलं, ते चुकीचंच नाही, तर बेकायदेशीर आहे. ३० जानेवारी रोजी निवडणूक अधिकाऱ्याने आप-काँग्रेसची ८ मते अवैध घोषित केली आणि भाजपने चंदीगड महापौर निवडणुकीत विजय मिळवला. सुप्रीम कोर्टाने नंतर हा निकाल रद्द केला आणि आपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले", असे शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> 'पवार या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार', मोदींची बोचरी टीका
पुढे बोलताना पवार म्हणाले की, "काँग्रेस उमेदवारांचा अर्ज फेटाळल्यानंतर आणि इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सूरतमध्ये भाजपच्या लोकसभा उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले."
ADVERTISEMENT
काँग्रेसचा जाहीरनामा मोडून-तोडून सांगताहेत, पवारांची भाजपवर टीका
"आता ते इतके घसरले आहेत की, काँग्रेसचा जाहीरनामा तोडून मोडून सांगत आहेत आणि आरक्षण व संविधानाशी छेडछाड केली जाईल अशी भाषा करत आहेत. जाहिरानाम्यात हे कुठे लिहिलेलं आहे? ते कपोलकल्पित गोष्टी सांगत असतात", अशी टीका शरद पवार यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT