Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेला इतकं माहित नाही की...", ओबीसी उमेदवारावरून भुजबळांनी छेडलं
Chhagan Bhujbal Crtiticize Manoj Jarage : नाशिक ओपनची जागा आहे, मग तिकडे ओबीसी का लढतात. या अतिहुशार माणसाला हे ही माहिती नाही, विधानसभा आणि लोकसभेला ओबीसीला आरक्षण नाही आहे. आतापर्यंत जे ओबीसी उमेदवार निवडून आले आहेत, ते ओपनमधूनच निवडून आले आहेत. मी सुद्धा येवल्यातून ओपनमधूनच निवडून येतो. पंकज भुजबळ, समीर भुजबळ, मुंडे साहेब ओपनमधूनच आले होते.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal Crtiticize Manoj Jarage : 'जरांगेंच काय सगळेच ऐकतात काय? असे म्हणत, या अतिहुशार माणसाला हे ही माहिती नाही की विधानसभा आणि लोकसभेला आरक्षण नाही आहे. ओबीसी उमेदवार हे ओपनमधूनच निवडून येतात. याला हे सुद्धा माहित नाही. हे याच ज्ञान आहे, अशा शब्दात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) टीका केली आहे. (chhagan bhujbal criticize manoj jarange patil lok sabha election 2024 maratha reservation nashik lok sabha seat prakash shendge threat)
मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी छगन भुजबळ यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत बोलताना भुजबळ यांनी जरांगे पाटलांच ज्ञान काढलं होतं. भुजबळ म्हणाले की, जरांगेचं ज्ञान इतकं आहे की तो म्हणाला, बीड ओपनची जागा आहे, मग तिथे ओबीसी का लढतात? नाशिक ओपनची जागा आहे, मग तिकडे ओबीसी का लढतात. या अतिहुशार माणसाला हे ही माहिती नाही, विधानसभा आणि लोकसभेला ओबीसीला आरक्षण नाही आहे. आतापर्यंत जे ओबीसी उमेदवार निवडून आले आहेत, ते ओपनमधूनच निवडून आले आहेत. मी सुद्धा येवल्यातून ओपनमधूनच निवडून येतो. पंकज भुजबळ, समीर भुजबळ, मुंडे साहेब ओपनमधूनच आले होते, असे कित्येक लोक ओपनमधूनच येतात. याला हे सुद्धा माहित नाही हे याच ज्ञान आहे, अशा शब्दात भुजबळांनी जरांगेंचे ज्ञान काढलं आहे.
हे ही वाचा : Ujjwal Nikam : पूनम महाजनांचे तिकीट कापून भाजपने ज्यांना उमेदवारी दिली, ते निकम कोण?
नाशिकमध्ये भुजबळांना तिकीट दिलं तर मताचे ध्रुवीकरण होईल आणि त्याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा होती. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, दोन-तीन ठिकाणी ओबीसी किंवा इतर उमेदवार उभे आहेत आणि आरक्षण नाही तिथे दलित समाजाचे उमेदवार आहेत. बाकी तर सर्व ठिकाणी मराठा समाजाचेच उमेदवार आहेत. आणि कसा काय माझ्यामुळे त्यांच्या मतांवर परिणाम होईल. आणि जरांगेच काय सगळेच ऐकतात का? प्रत्येकाचा आपपला पक्ष आहे. आयुष्यभर उमेदवार आपआपल्या पक्षाचं काम करतो, असे देखील भुजबळांनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंना आज काहीतरी धमकी देण्यात आली. भुजबळांनी उमेदवारी मागे घेतली, तु मागे घे नाही तर तुझं अमुक करू तमूक करू. पण वडणुकीत उभं राहण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. ज्याला मतं द्यायची त्यांनी द्या, ज्यांना नाही द्यायची त्यांनी देऊ नका. तसेच मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही.आतापर्यंत माझा तो इतिहास राहिला आहे स्पष्टपणे बोलण्याचा, घाबरण्याचा इतिहास छगन भुजबळांचा नाही आहे, असे भुजबळांनी स्पष्टच सांगितलं.
हे ही वाचा : अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
ADVERTISEMENT