Devendra Fadnavis : महाराष्ट्रात भाजप का हरली? फडणवीसांनीच सांगितली चार कारणे
Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे सांगितली आहेत. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. अपेक्षेपेक्षा आम्हाला खुप कमी जागा आल्या. 2019 पेक्षा फ्रँक्शनने कमी जागा मिळाल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Lok Sabha Result : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएचा पराभव झाला आहे. एनडीएला महाराष्ट्रात अवघ्या 17 जागाच जिंकता आल्या तर इंडिया आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे.यासोबत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत झालेल्या (Maharashtra Lok Sabha) पराभवाची कारणे सांगितली आहेत. (devendra fadnavis tell the reason why bjp lost in maharashtra lok sabha election 2024 bjp nda india alliance maha vikas aghadi mahayuti)
ADVERTISEMENT
लोकसभेच्या निकालानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीतील पराभवाची कारणे सांगितली आहेत. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही.अपेक्षेपेक्षा आम्हाला खुप कमी जागा आल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : Bajrang Sonawane: पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या खासदाराच्या गाडीला अपघात! नेमकं घडलं काय?
सोयाबिन आणि कापसाचे दर मध्यंतरी कोसळले नंतर थोडे वर आले. त्याचा एक फटका शेतकऱ्यांना बसला.त्याला भावानंतर योजना तयार केली होती. पण आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना पैसे देऊ शकलो नाही. त्याचा रोष आम्हाला निवडणुकीत सहन करावा लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सरकारने आरक्षण दिल्यानंतरही काही भागात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एक नरेटीव्ह तयार करण्यात आला. त्यााला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा देखील फटका आम्हाला विशेषत मराठवाड्यात बसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे वाचलं का?
फडणवीस पुढे म्हणाले, विरोधकांनी जो संविधान बदलणार हा नरेटीव्ह तयार केला होता. तो नरेटीव्ह थांबण्यात आम्ही अपयशी ठरलो. त्यामुळे आम्ही जनतेचा कौल मान्य करत पुढची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. इलेक्शनच्या अर्थमॅटीक असते त्यात आम्ही पराभूत झाल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
तसेच या निवडणुकीचं नेतृत्व भाजपमध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी झाल्या असतील. याची सगळी जबाबदारी माझी आहे, ती मी स्विकारतो. मी हे मान्य करतो कुठे तरी मी कमी पडलो आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजपला हा जो सेटबँक महाराष्ट्रात सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो,असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी करत पराभवाची जबाबदारी स्विकारली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 : महाराष्ट्रात भाजपच्या चार मंत्र्यांचा दारूण पराभव
आता मला विधानसभेसाठी पुर्णवेळ द्यायचा आहे. मी भाजपच्या नेतृत्वाला विनंती करतो की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पुर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी.मी पक्षामध्ये ज्या काही कमतरता राहिल्या आहेत. त्या कमतरता पुर्ण करण्यासाठी वेळ देईन. मी बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जी टीम असेल, त्यांच्यासोबत मी असेनच. या संदर्भात लवकरच पक्षाच्या नेत्यांनी मी भेटणार आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर पुढील कारवाई करेन, असे फडवणीस यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT