Lok Sabha election : माढ्यात भाजपला बसणार जबर झटका? पवारांचा उमेदवार ठरणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस.
social share
google news

Madha Lok Sabha Election 2024 : भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला माढा लोकसभा मतदारसंघात मोठा झटका बसण्याची चिन्हं आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार जाहीर केलेला आहे. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असून, पवारांनी अजूनही उमेदवार निश्चित केलेला नाही. पण, पवारांच्या खेळीने माढ्यातील गणित बदलू शकतं असं म्हटलं जात आहे. कारण धैर्यशील पाटील हेच तुतारी फुंकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यास अनुकूल होते, पण जानकरांनी यू टर्न घेत महायुतीलाच पाठिंबा दिला. आता या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. 

धैर्यशील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?

गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. तसे त्यांचे समर्थकही म्हणत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, पण त्याला रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून विरोध होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Raj Thackeray यांना पहिला धक्का! मोदींना पाठिंबा देताच 'या' नेत्याने सोडली साथ! 

विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज आहेत. कारण धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीसाठी स्पर्धेत होते. विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न गेल्या  काही दिवसांपासून सुरू आहेत. भाजपचे गिरीश महाजन यांनीही त्यांच्याशी चर्चा केली, अजूनही नाराजी दूर झालेली नाही. 

अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. १२ तारखेला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला सर्व समर्थक उपस्थित राहणार असून, त्यात अंतिम निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सांगलीत आंबेडकर-पाटील ठाकरेंच्या उमेदवाराचा करणार गेम?

दुसरीकडे माढातील स्थानिक राजकीय वर्तुळात अशी चर्चा जोरदार रंगली आहे की, धैर्यशील मोहिते पाटील हे १३ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे. अशी राजकीय समीकरणे जुळून आल्यास हा भाजपसाठी मोठा हादरा असेल. कारण माढाबरोबर सातारा, सांगली आणि सोलापूरमधील राजकीय गणितही बदलेलं. त्यामुळे आता भाजपच्या मनधरणीला यश मिळते की, पवारांचा डाव यशस्वी ठरतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. 

ADVERTISEMENT

पवारांनी माढ्यातील सस्पेन्स वाढवला

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या आहेत. त्यातील ९ जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, माढ्यातील उमेदवार अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात धैर्यशील मोहिते पाटलांकडून हालचाली सुरू झाल्याने हा सस्पेन्स वाढला आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT