Raj Thackeray यांना पहिला धक्का! मोदींना पाठिंबा देताच 'या' नेत्याने सोडली साथ!

मुंबई तक

MNS kirtikumar shinde Facebook Post : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

ADVERTISEMENT

मनसेच्या सदस्यत्वाचा कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला.
मनसेच्या सरचिटणीस पदासह सदस्यत्वाचा कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा

point

कीर्तिकुमार शिंदे यांनी दिला सरचिटणीस पदाचा राजीनामा

point

पोस्ट लिहून व्यक्त केली खंत

Raj Thackeray Latest News : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील, ही चर्चा खरी ठरली. त्यांनी तशी घोषणा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेतून केली. मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेनंतर राज ठाकरेंना पहिला झटका बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. (kirtikumar shinde quits Maharashtra Navnirman Sena after raj thackeray extend support to bjp)

 "राज ठाकरे यांची त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही", असे म्हणत कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांनी दीर्घ पोस्ट लिहून भूमिका मांडली आहे. 

कीर्तिकुमार शिंदे यांची पोस्ट... वाचा जशीच्या तशी

अलविदा मनसे!

"महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं.

हे वाचलं का?

    follow whatsapp