Eknath Shinde : "तिकीट मिळेल की नाही, हे..."; एकनाथ शिंदेंचा आमदारांना स्पष्ट मेसेज

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

eknath shinde clear message to mps mla on lok sabha election 2024 vijay shivtare baramati lok sabha
येत्या निवडणुका खरी परीक्षा आहे. आमदार म्हणून जितका लीड द्याल ते तुमचं प्रगती पुस्तक असेल.
social share
google news

Eknath Shinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि उपनेत्यांची बैठक पार पडली. मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना तिकीट मिळण्याबद्दल महत्त्वाचा मेसेज दिला. 

एकनाथ शिंदे म्हणाले, "येत्या निवडणुका खरी परीक्षा आहे. आमदार म्हणून जितका लीड द्याल ते तुमचं प्रगती पुस्तक असेल. पुढचं तिकीट मिळेल की नाही, हे त्यावरून ठरेल. आमदार जिल्हाप्रमुखांची पदाधिकाऱ्यांची ही खरी टेस्ट आहे", असा स्पष्ट मेसेज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह पदाधिकाऱ्यांना दिला. 

सगळ्यांची माझ्याकडे कुंडली -एकनाथ शिंदे

पुढे ते म्हणाले, "मी कितीही बिझी असलो, तरी प्रत्येक तालुक्याची खबर माझ्याकडे येते. मला कुणी फसवू शकत नाही. फसवू पण नका, सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे", असा सूचक इशाराही शिंदेंनी यावेळी नेत्यांना दिला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मोदी सरकारला निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा दणका!

"पक्षाची शिस्त कुणीही बिघडू नका, मी पण बिघडणार नाही. इथे कुणी नोकर नाही. आपण सगळे मालक आहोत. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे आपल्याला घरघडी समजायचे. इथे राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. कार्यकर्ते जीवाचं रान करून आपल्याला निवडून आणतात. निवडणूक संपल्यानंतर आपण त्यांना विसरतो. कार्यकर्त्यांच्या संकटात उभं रहा त्यांना वाऱ्यावर सोडू नका", असेही एकनाथ यावेळी म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1) "निवडणूका असू द्या, नसू द्या शिवसेनेचं काम अखंड सुरू राहते बाळासाहेबांची हीच शिकवण आहे. पूर असो दुष्काळ असो कोविड असो शिवसैनिक कायम मदतीला पुढे असतो; तो कधी घरात बसून काम करत नाही. आपल्या कुटुंबावर संकट आलं की इकडे तिकडे पळणारे कधी कार्यकर्त्यांसाठी धावलेले दिसले नाहीत"

ADVERTISEMENT

2) "इंडियाच्या सभेत त्यांना फक्त 5 मिनिटं बोलायला दिलं. मोदी द्वेषाने पछाडलेले लोक तिथं एकत्र जमले होते. बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केलं, ३७० कलम रद्द केलं. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणाऱ्यांना औरंगजेब म्हणतात; पण याकुब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणारे कोण? औरंगजेबाने वडिलांना सोडलं नाही, भावाला सोडलं नाही. अशी वृत्ती असणारा औरंगजेब कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे."

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune Lok Sabha : भाजप, काँग्रेसचे उमेदवार फायनल; वसंत मोरेंकडे पर्याय काय?

3) "शेतकऱ्यांना दोन वर्षात 45 हजार कोटी रुपये देणारं हे पहिलं सरकार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन वर्षात २०० कोटी रुपयांची मदत देणारं हे पहिलं सरकार आहे. रुग्णांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा देणारं हे पहिलं सरकार आहे. दोन वर्षांत पाच लाख कोटींची गुंतवणूक आणणारं हे पहिलं सरकार आहे."

4) "दोन वर्षांत ५०० लोकहिताचे निर्णय घेणारं पहिलं सरकार आहे. शासन आपल्या दारी या योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ देणारं पहिलं सरकार आहे. बचत गटांच्या ६० लाख महिलांना २५ कोटींचे २५० कोटी देणारं पहिलं सरकार आहे. ७५ वर्षांवरील नागरीकांनी ३ कोटी तिकिटं काढून प्रवास केलाय."

ठाकरेंवर टीकेचे बाण

शिंदे म्हणाले, "हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ कचरू लागली आहे. शिवतीर्थावर बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही. योगेश कदमांना पाडायचं कारस्थान त्यांनी केलं. मोदींना औरंगजेबाची उपमा देतात, हा देशांचा अपमान आहे. लोक त्यांना धडा शिकवतील", अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली. 

"अमित शहांवर टीका केली; पण मेव्हण्याला नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीला कोण गेलं होतं?", असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंना कात्रीत पकडलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT