Mahayuti : "भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव", शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपकडून जागावाटपात आणि उमेदवारांबद्दल शिंदेंवर दबाव टाकला जात असल्याचे विधान सुरेश नवले यांनी केले.
शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी भाजपवर टीका केली आहे.
social share
google news

Suresh Navale on Mahayuti Seats Sharing for Lok Sabha : भाजपने एकनाथ शिंदे यांना काही जागांवरचे उमेदवार बदलण्यास सांगितले आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी भाजपबद्दल स्फोटक विधान केले आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा दावा सुरेश नवले यांनी केला. नेमकं नवले काय म्हणाले? (BJP Pressuring for replace Shiv sena lok sabha candidates said Shiv Sena leader suresh navale)

सुरेश नवले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीला जे लोकं नकोय, ते बददले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी ते सर्व्हेची कारणे देताहेत. आयबीचा रिपोर्ट विरोधात आहे. आम्ही जो सर्व्हे केला आहे, तो विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही तो उमेदवार बदला. हे भाजपचे राजकारण चुकीचे आहे", असे नवले म्हणाले.  

भाजपचे षडयंत्र

नवले पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहे, परंतु ठाम आहेत. हा विश्वास आम्हाला आहेत. ते भाजपच्या एकूण या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. पण, अशा प्रकारचे चित्र भारतीय जनता पार्टीकडून बाहेर उभं केलं जात आहे. बाहेर चर्चा होतेय. ही चर्चा युतीसाठी घातक आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला झटका! विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत करणार प्रवेश?  

"एकनाथ शिंदेंसोबत जे खासदार आलेत, त्यांच्या अपेक्षा आहे की, आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. आपण उमेदवार असलो पाहिजे. शिंदेंचीही तिच अपेक्षा आहे. पण, भाजप दबाव तंत्राचा अवलंब करून संबंधित अमूक एक व्यक्ती आहे, तो उमेदवारीस पात्र नाही. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आयबीचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत. असे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आणि जवळची माणसं दूर करणं भाजपला शोभत नाही", अशी टीका सुरेश नवले यांनी केली आहे.  

शिंदेंसोबत आलेल्या आमदार-खासदारांमुळे भाजपला सत्तेची फळं

सुरेश नवले पुढे म्हणाले की, "एकनाथ शिंदेंनी केलेला उठाव हा महाराष्ट्रातील चमत्कार होता. ही अभूतपूर्व घटना होती. त्यामुळे भाजपला सत्तेची फळं चाखता येऊ लागलेली आहेत. एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदार आणि खासदारांमुळे ही फळं चाखता येऊ लागलेली आहेत."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसने एकच उमेदवार केला जाहीर अन् वंचितचा विषयच...

"हेच भाजप विसरायला तयार झालीये की, यांच्यासोबत आलेल्या आमदार-खासदारांना बाजूला काढायचं. १२ मध्ये ही स्थिती असेल, तर २८८ मध्ये काय स्थिती राहणार आहे, ही जर कल्पना केली तर अंगावर काटा उभा राहतो. नंतर तर चर्चेला वावच नाही. आम्ही सांगू तिच पूर्व दिशा. २८८ पैकी, २७७ आम्ही घेतो. १० फक्त आणि बाकी निगेटिव्ह, असं चालत नसंत", असं सुरेश नवले म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT