Unmesh Patil : भाजपला झटका! विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत करणार प्रवेश?

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा मतदारसंघात समीकरणे बदलणार.
उन्मेष पाटील भाजपतून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार असल्याची चर्चा.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

भाजपचे उन्मेष पाटील शिवसेनेच्या (ठाकरे) वाटेवर

point

भाजपच्या विद्यमान खासदाराला ठाकरे उतरवणार मैदानात

Lok Sabha Election 2024 Unmesh Patil : लोकसभा निडवणुकीच्या तयारीत गुंतलेल्या भाजपला जळगावमध्ये झटका बसण्याची शक्यता आहे. जळगावचे विद्ममान खासदार उन्मेष पाटील यांचे भाजपने तिकीट कापले. तेव्हापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता ते आपल्या सहकाऱ्यांसह खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Unmesh Patil may be quit BJP)

ADVERTISEMENT

भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते नाराज असून, भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. तशा हालचाली सध्या त्यांच्याकडून सुरू आहेत. 

ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्याआधीपासूनच ही चर्चा सुरू होती की, भाजपने डावलल्यास ते पक्षांतर करू शकतात. भाजपने स्मिता वाघ यांना उमदेवारी दिल्यानंतर ते नाराज झाले. ते आता शिवसेनेते  (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, मंगळवारी (2 एप्रिल) उन्मेष पाटील हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईत आले. ते राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी गेले. मात्र, तिथे आमदार सुनील राऊत यांच्यासोबत त्यांची भेट झाली. आता ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

हेही वाचा >> ठाकरे-काँग्रेसमध्ये घमासान, 'ही' जागा मविआत ठरतेय बिब्बा? 

संजय राऊत यांची भेट घेण्यापूर्वी उन्मेष पाटील म्हणाले की, "मी आणि माझी सहकारी आलेलो आहे. आम्ही संजय राऊत यांची भेट घेत आहोत." 

ADVERTISEMENT

पाटील यांच्यासोबत आलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही भेटायला आलो आहोत. साहेबांसोबत चर्चा करायची आहे. चर्चेनंतर ठरेल. उमेदवारीबद्दल उद्धव ठाकरे ठरवतील.

ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा मतदारसंघात युतीचे वर्चस्व

उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघावर भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. आता महायुतीमध्ये भाजपकडे हा मतदारसंघ आहे, तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

२०१९ लोकसभा निवडणूक 

गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील हा नवा चेहरा भाजपने दिला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव पाटील हे निवडणूक लढवत होते. पण, उन्मेष पाटील यांनी चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला होता.

हेही वाचा >> आंबेडकरांविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे अभय पाटील कोण? 

जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. 

जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजप)

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना-शिंदे गट)

चाळीसगाव - मंगेश चव्हाण (भाजप)

अमळनेर - अनिल पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना-शिंदे गट)

पाचोरा किशोर पाटील (शिवसेना -शिंदे गट)

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT