Lok Sabha 2024 : "इंडिया आघाडी 295 जागा जिंकणार", Exit Poll आधी कुणी मांडलं गणित?
Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिला होता.मात्र इंडिया आघाडीने नेमक्या त्यांच्या किती जागा येणार याबाबतचा कोणताच आकडा सांगितला नव्हता. इतकचं नाही तर थोड्याच वेळात आता एक्झिट पोल येणार आहेत.
ADVERTISEMENT
India Alliance Win 295 Seat : देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान अंतिम टप्प्यात आलं आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीची (India Alliance) दिल्लीत बैठक पार पडली आहे.या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीला 295 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खरगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (exit poll 2024 india alliance win 295 seat says mallikarjun kharge india alliance meeting lok sabha election 2024)
लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिला होता.मात्र इंडिया आघाडीने नेमक्या त्यांच्या किती जागा येणार याबाबतचा कोणताच आकडा सांगितला नव्हता. इतकचं नाही तर थोड्याच वेळात आता एक्झिट पोल येणार आहेत. या एक्झिट पोलच्या माध्यमांवरील चर्चेत देखील त्यांनी सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता निवडणूक संपण्याच्या काही तास आधी त्यांनी इंडिया आघाडीला किती जागा येणार याचा आकडा सांगितला आहे.
हे ही वाचा : 2014 ते 2024...मागच्या 10 वर्षात एक्झिट पोल किती ठरले होते अचूक?
प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीला 295 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला इतक्या जागा येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Exit Polls 2024 LIVE Update : देशात कुणाची येणार 'सत्ता'? पहा एक्झिट पोलचा अंदाज
दरम्यान दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यासह अनेक विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
ADVERTISEMENT