Lok Sabha : सत्ता स्थापण करणार की विरोधात? INDIAच्या बैठकीनंतर खरगेंनी काय सांगितलं?
India Alliance Delhi Meeting : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. तसेच देशात सरकार स्थापण करण्यासाठी 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.त्यामुळे त्यांना अजून 38 खासदारांची गरज आहेत.
ADVERTISEMENT
India Alliance Delhi Meeting : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (mallikarjun kharge) यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेली इंडिया आघाडीची बैठक संपली आहे. तब्बल दीड तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना संबोधित करत बैठकीतला तपशील सांगितला आहे. नेमकं बैठकीनंतर खरगे काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (india alliance delhi meeting end mallikarjun kharge speak what alliance partner decide in meeting)
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे संजय राऊत, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी, आरजेडीचे तेजस्वी यादव, द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना, आप नेते राघव चढ्ढा आणि सीपीआय(एम) सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. तब्बल दीड तास नेत्यांमध्ये चर्चा झाली.
हे ही वाचा : Nilesh Lanke : ''माझ्या मुलाला मारण्याचा कट...'', लंकेंच्या आईच्या विधानाने खळबळ
या बैठकीनंतर खर्गे माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही खूप चांगले आणि एकत्र लढलो. संविधानात लिहिलेल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायाच्या तत्त्वांचा आदर करणाऱ्या सर्व पक्षांचे इंडिया अलायन्स स्वागत करते. मोदी आणि त्यांच्या राजकारणाच्या शैलीविरोधात जनादेश मिळाला आहे. हे त्यांचे वैयक्तिकरित्या मोठे राजकीय नुकसान आहे. हा त्यांचा नैतिक पराभव आहे.
हे वाचलं का?
दरम्यान या निवडणुकीत इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. तसेच देशात सरकार स्थापण करण्यासाठी 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.त्यामुळे त्यांना अजून 38 खासदारांची गरज आहेत. त्यामुळे आता त्यांना भागिदार शोधावे लागणार आहेत.
हे ही वाचा : Maharashtra Lok Sabha : भाजपचे बालेकिल्ले ढासळले! मराठवाड्यात प्रचंड हादरे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT