Exit Poll : 'या' 5 राज्यांनी बिघडवलं INDIA आघाडीचं गणित, भाजपची मुसंडी?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

india today and axis my india exit poll 2024 these 5 state india alliance big blow and bjp nda win exit poll result
एक्झिट पोलच्या आकड्यानुसार देशात भाजप 400 पार करत प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे.
social share
google news

India Today and Axis My India Exit Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालाआधी एक्झिट पोलचे (Exit Poll Result) आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार देशात भाजप 400 पार करत प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. तर पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) या पाच राज्यात धक्कादायक निकाल हाती आले आहेत. आतापर्यंत या राज्यात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व दिसत होते. मात्र यावेळेस मोठा उलटफेर होताना दिसत आहे. त्यामुळे या राज्यांकडून इंडिया आघाडीची (India Alliance) मोठी निराशा होणार असून त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (india today and axis my india exit poll 2024 these 5 state india alliance big blow and bjp nda win exit poll )

ADVERTISEMENT

देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. इंडिया टुडे आणि ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला 361 ते 401 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना 8 ते 20 जागा मिळू शकतात. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात या पाच राज्यांतून आलेल्या एक्झिट पोल बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Maharashtra Exit Poll : सांगली, बारामती कुणाचा 'गेम'? पहा एक्झिट पोल

आंध्र प्रदेशचा निकाल काय? 

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी, भाजप आणि जनसेवा पक्षाने मोठा उलटफेर केला आहे. याचा फटका सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षाला बसणार आहे. आंध्र प्रदेशात एनडीएला 21 ते 23 जागा मिळू शकतात तर सत्ताधारी वायएसआरसीपीला 2 ते 4 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला आंध्र प्रदेशात खाते देखील उघडता आले नाही आहे. 

हे वाचलं का?

2019 च्या निवडणुकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष YSRCP ने आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीला लोकसभेत 3 जागा मिळाल्या होत्या. वायएसआरसीपीला 49.9 टक्के मते मिळाली. टीडीपीला 40.2 टक्के मते मिळाली. काँग्रेस, भाजप, जनसेना पक्षाचे खाते उघडले नाही.

ओडिशाचा निकाल काय? 

ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. या राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष बनताना दिसत आहेत. एक्झिट पोलनुसार भाजप 18-20 जागा जिंकताना दिसत आहे. तर सत्ताधारी बीजेडीला मोठा झटका बसताना दिसून त्यांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया ब्लॉकला 0 ते 1 जागा मिळू शकते. ओडिशात भाजपला एकूण 11 जागांची आघाडी मिळणार आहे. तर बीजेडीला 11 जागांचे थेट नुकसान होत आहे.

ADVERTISEMENT

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. ओडिशात बीजेडीला 12 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 8 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ एक जागा जिंकण्यात यश आले होते. 2014 च्या निवडणुकीत बीजेडीने 20 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपला फक्त एक जागा मिळाली होती. 10 वर्षात भाजपने ओडिशात मोठा बदल केला आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Exit Poll मध्ये शरद पवारांचा 'आकडा' ठरला खरा!

तेलंगणाचा निकाल काय?

तेलंगणात लोकसभेच्या एकूण 17 जागा आहेत. पाचच महिन्यांपूर्वीच येथे विधानसभेची निवडणूक झाली होती आणि राज्यात काँग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या अंदाजाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. तेलंगणात एनडीए धक्कादायक कामगिरी करताना दिसत आहे आणि बीआरएस-काँग्रेसचा बालेकिल्ला त्यांनी मोडला आहे. एनडीएला 11 ते 12 जागा मिळताना दिसत आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम ला 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीला (BRS) पराभवाला सामोरे जावे लागू शकते.
 

2019 च्या निवडणुकीत केसीआरच्या पक्ष बीआरएस ने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजपला 4 जागा आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे हैदराबादमधून 5 लाख मतांनी विजयी झाले होते. 

महाराष्ट्राचा निकाल काय?

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात  एनडीएला 28 ते 32 जागा इंडिया आघाडीला 16 ते 20 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळू शकतात.भाजपने  मोठा विजय मिळूनही गेल्यावेळच्या तुलनेत भाजप आणि एनडीए या दोन्ही पक्षांना राज्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वेळी भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. यावेळी फक्त 22 येताना दिसतायत. तर गेल्या वेळी एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या, यावेळी त्या केवळ 32 वर आल्या आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. त्यानंतर भाजप आणि शिवसेना (उद्धव) यांनी एकत्र निवडणूक लढवली. भाजपने 27.8 टक्के मतांसह 23 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 23.5 टक्के मतांसह 18 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एआयएमआयएम आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र, आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे गट हा इंडिया ब्लॉकचा भाग आहे. शिंदे गट एनडीए गटात आहे. 2019 मध्ये, AIMIM आणि VBA यांनी युती करून निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या खात्यात फक्त एक जागा आली होती. तर एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली.

पश्चिम बंगालचा निकाल काय?

 पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. भाजपला 26 ते 31 जागा मिळू शकतात. सत्ताधारी टीएमसीला 11 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डावे (इंडिया ब्लॉक) 0 ते 2 जागा मिळू शकतात. इतरांची खाती उघडताना दिसत नाहीत.

2019 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी 40.3  टक्के मतांसह 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीने  43.7 टक्के मतांसह 22 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. काँग्रेसला फक्त दोन जागा जिंकता आल्या आणि पक्षाची मते 5.7 टक्के होती. यावेळच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ तर आहेच, पण मतांची टक्केवारीही लक्षणीय वाढण्याची अपेक्षा आहे. टीएमसी 3 टक्के मते गमावत आहे आणि इतरांना 3 टक्के मते कमी होत आहेत. भाजपच्या मतांमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

दरम्यान आता हे आकडे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आहेत. आता 4 जूनच्या निकालात हे आकडे किती खरे ठरतात हे पाहावे लागणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT