Lok Sabha Election 2024: ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! विद्ममान खासदाराचा पक्षप्रवेश ठरला

रोहित गोळे

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का
उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का
social share
google news

BJP's Jalgaon MP Unmesh Patil all set to quit BJP: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या तोंडावर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण जळगावचे भाजपचे विद्ममान खासदार उन्मेष पाटील हे भाजपला रामराम करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. उन्मेष पाटील यांनी आज (2 एप्रिल) शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'मातोश्री'वर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (lok sabha election 2024 uddhav thackeray big blow to bjp entry of the dissident mp unmesh patil into the shiv sena ubt party was confirmed)

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, "उद्या दु. 12.30 ला जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश. ओरिजिनल शिवसेना परिवारात आपले मनःपूर्वक स्वागत."

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचा उन्मेष पाटलांना फोन.. 

उन्मेष पाटील यांनी आधी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. पण उद्धव ठाकरे यांच्या या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील यांना कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केल्याचं यावेळी समजतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Narayan Rane : ''लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार''

आधी संजय राऊतांची भेट अन् नंतर..

भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी आधी पोहोचले. तिथे उन्मेष पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते.

उन्मेष पाटील यांच्या भेटीनंतर बोलताना खासदार संजय राऊतांनी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. राऊत म्हणाले की, "उन्मेष पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे. उद्यापर्यंत जळगावची उमेदवारी कळेल."

ADVERTISEMENT

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने 2019 मध्ये आमदार असलेल्या उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली होती. पण यंदा उन्मेष पाटलांचा पत्ता कट करत भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> VBA: तिसऱ्या यादीसोबत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, थेट बारामतीतच पवारांना...

भाजपचे विद्ममान खासदार उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, 'सगळ्या प्रश्नांवर मी सविस्तर बोलेन. आज बोलणे उचित नाही. मी माध्यमांशी मोकळा संवाद साधेल. मी आणि राऊत साहेबांनी संसदेत सोबत काम केलेलं आहे. आमची राऊत साहेबांशी चर्चा होत असते. त्यासाठी मी संवाद साधायला आलोय. राजकारणापलीकडे मैत्री जपली पाहिजे. तो जपण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही", असे उन्मेष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT