Maharashtra Lok Sabha 2024 : शिंदेंच्या सेनेच्या 'या' जागांवर भाजपचा कब्जा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

शिवसेनेकडे जे मतदारसंघ आहेत, त्यातील काही मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे.
भाजपने शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपकडून मतदासंघावर दावे केल्याने शिवसेनेत धुसफूस

Mahayuti Lok Sabha elections 2024 : भाजपच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली असल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुतीकडून लोकसभेच्या जागावाटपाची अजूनही घोषणा झालेली नाही. दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेच्या हक्काच्या जागांवरच कब्जा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार लढेल हे जाहीर सभेत सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणखी शिवसेनेच्या एका मतदारसंघावर दावा केला. (BJP Shiv Sena Seats sharing Latest Updates)

भाजप-शिवसेना युतीमध्ये जे मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिले आहेत. त्यातील काही मतदारसंघ भाजपकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघांत यावेळी भाजपचा उमेदवार असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला मोजक्याच जागा येणार असे दिसत आहे. 

महायुती जागावाटप : कल्याण ते अमरावती... 

भाजपकडून सगळ्यात आधी कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला. या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस सुरूच आहे. भाजपकडून सातत्याने दावे केले गेल्याने श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. हा मतदारसंघावर स्थानिक नेत्यांकडून दावा केला गेला. पण, येथूनच सुरूवात झाली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अमरावती

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये कायम शिवसेनेकडे राहिला आहे. विनायक राऊत हे गेल्यावेळी निवडून आले. पण, सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. या मतदारसंघावर पहिला हक्क शिंदेंच्या शिवसेनेचा असताना भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे घेतला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल, हे स्पष्ट केले आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्यावेळी या मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला, पण या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगाबादमधून भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आहे, असे सांगत या जागेवर दावा केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसचे उमेदवार ठरले! ठाकरेंकडून 'या' जागा गेल्या? 

अमरावतील लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे राहिला आहे. आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणांनी गेल्या पाच वर्षात भाजपशी जवळीक साधली. त्यामुळे आता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, असे म्हटले जात आहे. त्यात अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपचा असल्याचे सांगितले. त्यामुळे या मतदारसंघातूनही भाजपचा उमेदवार निवडणूक लढेल, हे स्पष्ट झाले आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप-महायुतीच्या 'या' जागांवर मविआचा होणार विजय? बघा संपूर्ण यादी

या मतदारसंघांबरोबरच कोल्हापूर, नाशिक, दक्षिण मुंबई या मतदारसंघातून भाजप उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेचे परंपरागत तीन लोकसभा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT