Lok Sabha Election Maharashtra : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब! नाशिक, पालघर कुणाला?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

महायुतीच्या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार.
social share
google news

Mahayuti Lok Sabha Election Seats Sharing : महायुतीच्या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक आणि पालघरच्या जागेचा निर्णय काय होणार, याबद्दल उत्सुकता होती. त्यावरही निर्णय झाला असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. (Mahayuti's Lok Sabha seat Sharing formula has been finalized)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी नाशिक आणि पालघरची जागा कोणता पक्ष लढवणार आहे, हे जाहीर केले. 

नाशिकची जागा शिंदेंकडे, पालघरमध्ये भाजपचा उमेदवार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. तर पालघरच्या जागेचा निर्णय भाजप घेणार आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं 

नाशिक आणि पालघर या दोन्ही मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, पण पालघरची जागा मिळवण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे आता महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल आहे. 

महायुतीत भाजपला 28, तर शिंदेंच्या सेनेला १५ जागा

अनेक महिन्यांपासून रखडलेले महायुतीचे जागावाटप अखेर निश्चित झाले आहे. नाशिक शिंदेंची सेना, तर पालघर भाजप लढणार आहे. त्यामुळे 48 पैकी 28 जागा भाजप, 15 शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागा आणि  1 जागा रासपचे महादेव जानकर लढवणार आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम'?

शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळतील अशी चर्चा सुरूवातीला होती, पण एकनाथ शिंदेंनी जागावाटपात मोठा वाटा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेलाच महायुतीमध्ये सर्वाधिक त्याग करावा लागलेला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT