Ashish Shelar : ''या कारणामुळे आम्ही हरलो''; शेलारांचे 'मुंबई TaK चावडी'वर स्पष्ट उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai tak chavadi ashish shelar tell the reason on maharashtra lok sabha result defeat
या निवडणुकीत सगळ्यात फायदेशीर पक्ष काँग्रेस ठरलाय.
social share
google news

Ashish Shelar, Mumbai Tak Chavadi : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा निकाल खूपच धक्कादायक निकाल लागला. महायुतीला अवघ्या 17 जागा आल्या मिळाल्या होत्या. यामध्ये भाजप फक्त 9 जागा जिंकू शकला होता. लोकसभेच्या या निकालासह इतर अनेक मुद्यावर भाष्य करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज मुंबई तकच्या चावडी  (Mumbai TaK Chavadi) वर हजेरी लावली होती. यावेळी चावडीवर शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे सांगितली आहेत.( mumbai tak chavadi ashish shelar tell the reason on maharashtra lok sabha result defeat) 

महाराष्ट्रातील लोकसभेचा निकाल अनपेक्षित, अनाकलनीय असा होता. आमची पडझड झाली आहे. अपेक्षित यश आम्हाला मिळालं नाही, असे आशिष शेलार यांनी मुंबई तकच्या चावडीवर कबूल केले आहे. आम्हाला  28 ते 30 जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र विरोधकांनी ज्याप्रकारे नरेटीव्ह तयार केलं आहे. या नरेटीव्हला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे आशिष शेलारांनी सांगितले आहे. तसेच या निवडणुकीत सगळ्यात फायदेशीर पक्ष काँग्रेस ठरलाय, तर उद्धव ठाकरे गटाला सर्वांधिक नुकसान झाल्याचे शेलारांनी सांगितले. 

हे ही वाचा : Modi Cabinet Portfolios: देशाचे नवे कृषी आणि आरोग्य मंत्री कोण? सगळी यादी जशीच्या तशी

आम्हाला आता विचार करावा लागेल. मतदार संघाचा, जिल्हा स्तरावरील राजकारणाचा आणि उमेदवारांच्या निवडीवरही विचार करावा लागेल. जातीपातीपासून विषयांपर्यंत, स्थानिक विषयापासून ते राज्यस्तरावरच्या नरेटीव्हपर्यंत या सगळ्याचे एक अवलोकन करावे लागेल,असे आशिष शेलारांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नव्या मैत्रीत आम्हाला यश मिळालं नाही असं मी म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा निवडून आल्या आहेत. त्यांना मतदान मिळालं आहे. हे मतदान ट्रान्सफरही झालं आहे. त्यामुळे ही मैत्री रूचली नाही असं म्हणता येणार नाही. पण जुन्हा मित्र गेला त्याचं नुकसान झालं आणि आमचंही नुकसान झालं असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : निवडणूक न लढवता लागली 'लॉटरी'! 11 जण थेट मोदींच्या मंत्रिमंडळात 'मंत्री'

ज्याला 25 वर्ष मित्र म्हणून घेतला, तो मैत्री टीकवायला तयार नाही आहे. त्यातून एक असा मर्द निघाला, जो म्हणाला बाळासाहेबांच्या विचाराने आमच्याशी मैत्री ठेवायला तयार आहे. त्यामुळे त्याचं भलं झाल त्यांचा आनंद आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच आमची पडझड झाली यात काय दुमत नाही. पण या पडझडीचे कारण शिंदेंची शिवसेना नव्हे,असे देखील शेलारांनी स्पष्ट केले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT