Exclusive: '2009 सालीच NCP भाजपसोबत जाणार होती..', सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

'2009 सालीच NCP भाजपसोबत जाणार होती..', सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
'2009 सालीच NCP भाजपसोबत जाणार होती..', सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
social share
google news

Lok Sabha Election 2024 Sunil Tatkare Exclusive interview: अभिजीत करंडे, मुंबई: '2009 सालीच राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेना किंवा भाजपसोबत जाणार होती.. याबाबत चर्चा देखील झाली होती आणि तेव्हा त्या चर्चेत मी देखील होतो..' असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत केला आहे. (mumbai tak exclusive interview in 2009 ncp was going to go with bjp or shiv sena sunil tatkare secret blast lok sabha election 2024)

ADVERTISEMENT

'भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांवर जे आरोप केले जात आहेत ते आरोप एकतर्फी आहेत. त्या आरोपात तथ्य नाही.. भाजपसोबत चर्चा ही 2019 किंवा 2014 पासून नाही तर 2009 सालापासूनच सुरू होती.' असं विधान करत सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी खळबळ उडवून दिली आहे. मुंबई Tak सोबत बोलताना त्यांचा सगळा रोख हा शरद पवार यांच्याकडे होता. मात्र, याबाबत त्यांनी कुठेही थेट नाव मात्र घेतलं नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंनी केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण यामुळे आता नव्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

सुनील तटकरेंचा खळबळजनक दावा.. पाहा नेमकं काय म्हणाले.. 

'आम्हाला असं अजिबात वाटत नाही की, आम्हाला ट्रॅप करण्यात आलं.. आम्ही एक भूमिका घेऊन जी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वारंवार मांडली.. तो काळ  60 वर्षांपूर्वीचा होता की, बहुजनांच्या हितासाठी सत्तेत असलं पाहिजे. आज आम्ही नक्कीच दावा करू शकतो की, आमच्या सत्तेतील सहभागानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आणि त्या भागाचा विकास झाला.'

हे ही वाचा>> "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

'भाजपसोबत जाण्याचा निर्णय काल किंवा आज झाला असं वक्तव्य जी काही मंडळी करत आहेत खोटेपणाचा आव आणून नव्हे तर कळस करून जे काही दावा करत आहेत. त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की, भाजपसोबत जाण्याचा निर्णय 2014 पासून होता.. 2009 सालापासून देखील मी सांगतोय. 2009 साली सुद्धा एक क्षण असा आला होता की, आम्ही आणि शिवसेना महाराष्ट्रात... तेव्हा बाळासाहेब हयात होते.' 

ADVERTISEMENT

'अशीपण चर्चा जवळपास.. एका विशिष्ठ स्टेजपर्यंत जाऊन पोहचली होती. हे मी जबाबदारीने सांगतोय. 2009 मध्ये.. त्यावेळेला सुद्धा भाजपसोबत युती व्हावी अशी चर्चा चालू होती. मी 2009 बद्दलच बोलतोय.. एकदम खात्रीशीरपणे..' 

ADVERTISEMENT

'माझ्या या दाव्यावर प्रत्युत्तर करावं.. मी कुठे, कुणाला.. कधी आम्हाला बोलावून काय सांगितलं हे सविस्तर सांगेन.' 

'2014 मध्ये देखील आपण पाहिलं की, निकाल येण्याआधीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला. तेव्हा भाजपने कुठे पाठिंबा मागितला होता?'

'2009 मध्ये एकतर केवळ शिवसेना किंवा मग फक्त भाजप.. याबाबत ज्या चर्चा झाल्या तेव्हा मी देखील होतो चर्चेत.. पण त्याबाबत मी आता सगळंच सांगणार नाही.' 

'2009 ला सगळं जुळून आलं नाही.. 2014 ला पण जुळून आलं नाही. 2016 ला आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. लोकसभेच्या जागा ठरल्या होत्या. पालकमंत्री पद, खाती ठरली होती. नाही तेव्हाही जुळून आलं. तेव्हा एवढ्यासाठीच जुळून आलं नाही की, शिवसेना सोबत असेल हे आम्हाला भाजपने सांगितलं. आम्ही सांगितलं नाही शिवसेना नको.. आज जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना आहे 2016 ला ती एकसंध होती.' 

हे ही वाचा>> "सुनील तटकरेंचं 'ते' प्रकरण उद्धव ठाकरेंपर्यंत जात होतं", सोमय्यांचा मोठा स्फोट

'माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की, आता जे केलं ते दादांनी केलं असं जे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केलं जातंय त्याबाबत सत्य सांगितलं गेलं पाहिजे.' असा खळबळजनक दावा हा सुनील तटकरेंकडून करण्यात आला आहे. 

आता सुनील तटकरेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT