Modi Cabinet 2024 : पुण्याचा माजी महापौरांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री, मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास
Modi Cabinet 2024 : महाराष्ट्रातून पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रात मंत्रीपद मिळवणारे मुरलीधर मोहोळ कोण आहे?
ADVERTISEMENT

MP Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत जवळपास 30 ते 40 मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा देखील समावेश असणार आहे. महाराष्ट्रातून पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे नगरसेवक, महापौर आणि आता थेट केंद्रात मंत्रीपद मिळवणारे मुरलीधर मोहोळ कोण आहे? हे जाणून घेऊयात. (murlidhar mohol pune mp profile mp minister in modi cabinet pm narendra modi oath taking ceremony)
कोण आहेत मोहोळ?
मुरलीधर मोहोळ यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1974 रोजी मुळशीमध्ये झाला आहे.
पुण्यात दहावीपर्यंत शिक्षण पुर्ण करून मोहोळ यांनी 1999 मध्ये कोल्हापूर गाठलं.
कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीत मोहोळ यांनी बीएचे शिक्षण घेतले होते. येथेच त्यांना कुस्तीची आवड झाली होती.