Maha Vikas Aghadi : "वंचितला सांगावं लागेल की...", पटोलेंचा स्फोटक खुलासा, आंबेडकरांना सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल मांडली स्पष्ट भूमिका.
social share
google news

Nana Patole on Prakash Ambedkar, vanchit Bahujan Aghadi : (देव कोटक, मुंबई) प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत बिनसल्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. दुसरीकडे काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली. याच भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपकडून मत विभाजन केले जात असून, पटोलेंनी आंबेडकरांना प्रश्न केला आहे. (Nana patole Said that BJP is use bsp and vanchit bahujan aghadi for vote dividation)

शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल स्फोटक दावे केले. नाना पटोले नेमकं काय बोलले, वाचा...

मतविभाजनासाठी बसपा, वंचितची मदत

नाना पटोले यांनी फडणवीसांवर मतविभाजनाचा आरोप केला. ते म्हणाले, "महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे. तुमच्याकडे गृहखातं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. तुम्ही काय करताय? याचा माणूस फोडा, त्याचा माणूस फोडो, याच्यावर ईडी लावा, त्याच्यावर सीबीआय लावा, हे सगळं बंद करा. महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करू नका."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरे फडणवीसांना म्हणाले, 'मी सगळा खर्च करतो'; बावनकुळेंनीही केला पलटवार

"आज तर चर्चा अशी चालू आहे की, बसपाचे उमेदवार तुम्हीच उभे करता. वंचितचे उमेदवार तुम्ही उभे करता. म्हणजे या राज्यात चाललं काय आहे? तुम्ही मत विभाजनाचं जे राजकारण करत होतात. त्या राजकारण सुद्धा लोकांना आता कळालयला लागलं आहे. तुम्ही मत विभाजन करून पुन्हा आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल. असं दोनदा तुम्ही केलं. आता तिसऱ्यांदा चालणार नाही. राज्यातील जनतेने मानस केलेला आहे की, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना जे तिलांजली देण्याचे काम भाजपने केलेलं आहे. लोक आता एकजूट झालेले पाहायला मिळत आहे."

"वंचितला सांगावं लागेल की पाठिंबा कोणत्या आधारावर?"

याच संदर्भात जेव्हा नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, "नागपूरच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला. तो कोणत्या आधारावर दिला, हेही सांगावं लागेल. एका ठिकाणी पाठिंबा देत आहात आणि दुसऱ्या ठिकाणी देत नाही."

ADVERTISEMENT

"गडकरी तर निवडणूक हरणार आहेत, त्यात काही दुमत नाही. ज्या प्रकारे षडयत्र सुरू आहे आणि ज्या प्रकारे उमेदवार समोर येत आहेत. मी स्वतः भंडारामध्ये बघितले, स्वतःच्या माणसालाच बसपाचा उमेदवार म्हणून उभं केलं. संघाचे लोक त्यांचा अर्ज भरताना सोबत होते", असा दावा पटोलेंनी केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वंचितचं मविआसोबत का फिस्कटलं? आंबेडकरांनी सांगितलं कारण

"आम्हाला वाटलं अपक्ष अर्ज भरला. पण, ज्यावेळी उमेदवारांची यादी आली, तेव्हा कळलं की, बसपाकडून अर्ज भरला. माझं म्हणणं आहे की, हे आता उघड झालं आहे की, भाजप मत विभाजनसाठी अशा पद्धतीचे राजकारण करत आहे", असे नाना पटोले म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की, "तो विषय आता बंद झाला आहे. आम्ही आजपर्यंत अकोलामध्ये उमेदवार दिला नाही. आतापर्यंत जाहीर केला नाही. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील या प्रयत्नात आम्ही होतो. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. शिवसेनेसोबत त्यांची आधीपासून आघाडी होती. शिवसेना आधीपासून महाविकास आघाडीमध्ये होती. आम्ही दोन पावले पुढे गेलो, पण नाही झालं. त्यांनी उमेदवार जाहीर केले. आम्ही अकोलामध्ये अजून उमेदवार जाहीर केलेला नव्हता, पण आज करू. पण, मुद्दा हा आहे की, आघाडीच संपली आहे, तर हा विषय राहत नाही", असे सांगत पटोलेंनी वंचित सोबतची चर्चा संपल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा >> सांगलीची जागा काँग्रेसला देणार?; ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

"पहिल्या टप्प्यात जिथे निवडणूक होत आहे, तिथे अर्ज मागे घेण्याची तारीखही संपली आहे. आम्ही अकोल्यात उमेदवार दिलेला नाही. माझा प्रश्न असा आहे की, जी स्थिती तयार होत आहे, २०१४, २०१९ मत विभाजनाची... लोक ती ओळखू लागले आहेत. सत्य लोकांसमोर आले आहे", असे पटोलेंनी यावेळी सांगितले.

नागपूर, कोल्हापुरात काँग्रेसला पाठिंबा

प्रकाश आंबेडकरांनी नागपूर आणि कोल्हापूर अशा ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, "कोल्हापूरचा विषय वेगळा आहे. नागपूर वेगळा विषय आहे. भांडण कुणाचं चाललं आहे आणि कुणाच्या आदेशाने होतंय. नागपूरमध्ये शाहू महाराज उभे नाहीत."

"काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्याची मानसिकता केली होती. आम्ही सगळीकडे उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही फक्त अकोला आणि धुळ्याची जागा रोखलेली आहे. कोण कुणाचे लोक आहेत, हे जनतेला समजलं आहे. यावेळी कोणताही फायदा होणार नाही", असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT