ठाकरे फडणवीसांना म्हणाले, 'मी सगळा खर्च करतो'; बावनकुळेंनीही केला पलटवार
Uddhav Thackeray Vs BJP : देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिले. यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडी घेत ठाकरेंना टोमणे सम्राट संबोधले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच कलगितुरा रंगला. राहुल गांधींना फडणवीसांना टोला लगावल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले. काय आहे मुद्दा जाणून घ्या...
वि. दा. सावरकर यांच्या जीवनावरील चित्रपट बघितल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी चित्रपट पाहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करण्याचा खर्च मी करतो."
हेही वाचा >> सांगलीची जागा काँग्रेसला देणार?; ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी फडणवीसांना काही ठिकाणी जाण्याचे आव्हान दिले. इतकंच नाही, तर त्यासाठीचा खर्च आपण करू असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे फडणवीसांना उद्देशून काय म्हणाले?
"मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो; त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. आणि लडाख मध्ये जाऊन यावे. त्यानंतर दार्जिलिंगमध्ये नीरज झिम्बा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचने कशी मोडली, त्यांना जाऊन भेटावं. अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन यावे. त्यांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च करायला मी तयार आहे. काश्मिरी पंडितांना त्यांनी भेटावं. बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नांदी लागलेत. त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा चित्रपट काढावा."










