PM Modi : बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख, मोदी NDA च्या बैठकीत काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या बैठकीत सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली.
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र मोदी यांचे एनडीएच्या बैठकीत भाषण

point

मोदींकडून अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण

point

एनडीएच्या बैठकीत मोदींची सभागृह नेतेपदी निवड

PM Narendra Modi : दिल्लीत संसदेतील मध्यवर्ती सभागृहात एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला. 

ADVERTISEMENT

एनडीएच्या बैठकीत बोलताना मोदी म्हणाले, "राजकीय जाणकारांनी जर खुल्या मनाने विचार केला, तर त्यांना दिसले की, एनडीए सत्ता मिळवण्यासाठीचा वा सरकार चालवण्यासाठीचा काही पक्षांचा गट नाहीये. हा राष्ट्रप्रथम या भावनेशी एकनिष्ठ असलेला हा गट आहे." 

एनडीए नैसर्गिक आघाडी -मोदी

पुढे मोदी म्हणाले की, "३० वर्षांचा मोठा कालखंड... सुरुवातीला कदाचित एकत्र आला असेल, पण आज मी सांगू शकतो की, भारताच्या राजकीय व्यवस्थेत एक नैसर्गिक आघाडी आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> मान्सून आला रे! महाराष्ट्रात धडकला, मुंबईत कधी येणार? 

मोदींकडून बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयींचा उल्लेख

एनडीएच्या बैठकीत बोलताना मोदींना एनडीएच्या नेत्यांचे स्मरण केले. "ही मूल्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्री प्रकाश सिंग बादल, श्री बाळासाहेब ठाकरे, श्री जॉर्ज फर्नांडिस, श्री शरद यादव असंख्य नाव मी सांगू शकतो. या लोकांनी जे बीज पेरले होते. ते आज भारताच्या जनतेने विश्वासाचे सिंचन करून या बिजाचा वटवृक्ष केला आहे", असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >> पहिल्याच भाषणात नितीश कुमार 'असं' का म्हणाले?, PM मोदींना जोरदार चिमटे!  

"आपल्या सगळ्यांजवळ अशा महान नेत्यांचा वारसा आहे. आम्ही आम्हाला याचा अभिमान आहे. मागील दहा वर्षात आम्ही एनडीएचा तोच वारसा, तीच मूल्य घेऊन निरंतर पुढे जाण्याचा आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत" अशा भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.  

ADVERTISEMENT

नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंचे कौतुक

"एनडीएचे हे जे लोक दिसताहेत ना, त्यांच्या एक समान गोष्ट दिसते आणि ती आहे सुशासन. या सगळ्यांनी आपापल्या काळात आणि त्यांच्या कार्यकाळात... जेव्हा जेव्हा सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा सुशासन देशाला दिले आहे", असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे कौतुक केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT