Maharashtra Weather : मान्सून आला रे! महाराष्ट्रात धडकला, मुंबईत कधी येणार?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Monsoon in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशभरात उष्णतेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे लोक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. यादरम्यान हवामान विभागाने (India Meteorological Department) दिलासादायक बातमी दिली आहे. IMD च्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गोव्यात अडकलेल्या मान्सूनने 6 जून 2024 रोजी गुरूवारी महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. (Weather updates Monsoon has arrived in Maharashtra when will it enters in Mumbai)

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी सांगितले की, मान्सून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पोहोचला आहे.

हेही वाचा : "अखेरच्या टप्प्यावर मी...", माधव भंडारींचा भाजप कार्यकर्त्यांना 'मेसेज'

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची एन्ट्री?

गुरूवारी दुपारी 3-4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलपूर भागात पाऊस बरसला आहे. काही तासांत पावसाची एन्ट्री ही मुंबई-पुण्यातही होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून 7 ते 9 जूनपर्यंत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : मुंबईचा इंजिनीअर, अमेरिकेचा क्रिकेटर... जगात नाव गाजवतोय सौरभ नेत्रावळकर!

 

महाराष्ट्रातील अनेक भागात लोकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मान्सूनची बातमी महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच दिलासा देणारी आहे. राज्यातील पावसाचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे.

हेही वाचा : Uddhav Thackeray : शिंदेंचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, भूकंप होणार?

महाराष्ट्रात मान्सूनसाठी हे अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. पण आता खऱ्या अर्थाने मान्सूनला सुरूवात झाली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT