Lok Sabha : निलेश लंके 'दादां'ना सोडून पवारांकडे गेले, कार्यालयात काय घडलं? वाचा Inside Story

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nilesh lanke meet sharad pawar ncp office book inaugration ajit pawar ncp political crisis maharashtra politics
''विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना, साहेबांच नेतृत्व आम्ही कधी सोडलेले नाही. तसेच खासदारकी आणि निवडणुकीबाबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केले.
social share
google news

Nilesh Lanke meet Sharad Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहुन लंकेचा पक्षप्रवेश घडवून आणतील अशी देखील चर्चा होती. मात्र या चर्चेच्या विपरीत प्रसंग घडला आहे. त्याचं झालं असं  ठरल्यानुसार पुस्तक प्रकाशन झालं त्यानंतर निलेश लंके शरद पवारांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. मात्र या पत्रकार परिषदेनंतरही देखील लंकेंचा प्रवेश घडला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.त्यामुळे नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात.  (nilesh lanke meet sharad pawar ncp office book inaugration ajit pawar ncp political crisis maharashtra politics) 
 
खरं तर गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील,अशी चर्चा होती. यावर आज अजित पवारांनी 'निलेश लंकेनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्याची आमदारकीच रद्द होईल', असा इशाराचा दिला होता. त्यामुळे अजित पवारांच्या प्रतिक्रियेनंतर लंकेंचा पक्षप्रवेश अटळ असल्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र शरद पवारांच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कुठलाच कार्यक्रम घडला नाही. पण दोन्ही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : CM शिंदेंनी शिवतारेंना पाहायला लावली तब्बल 7 तास वाट...

''मला माझ्या 2019 च्या विधानसभेची निवडणूक आठवते. माझ्या तेव्हाच्या प्रचाराची सुरुवात शरद पवारांनी केली होती. कोरोना काळात भाऊ-भावाला विसरले होते. त्यावेळी शरद पवारांची एक अदृष्य शक्ती मला लाभली आहे. कोरोना काळात संघर्ष करत असताना ज्या घटना घडल्या त्या मी विसरू शकत नाही. त्या घटना मी पुस्तकात लिहल्या. त्या पुस्तकाचं नाव 'मी अनुभवलेला कोविड' असा आहे. त्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन व्हावं अशी माझी इच्छा होती. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केले'', असे निलेश लंके यांनी म्हटले. 

''विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना, साहेबांच नेतृत्व आम्ही कधी सोडलेले नाही. तसेच खासदारकी आणि निवडणुकीबाबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केले. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. मी खासदारकीतला सर्वात छोटा घटक आहे. वरिष्ठ असताना आपण शांत राहणं याला सुसंस्कृतपणा म्हणतात. आमच्या सर्वांचे सर्वंस्व शरद पवार आहेत. शरद पवार सांगतील तोच आदेश मानेल, मी विचारधारा सोडलेली नाही'', असे निलेश लंके म्हणाले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ''अमित शाहांवर आमचा विश्वास'',

दरम्यान अजित पवारांनी पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा दिला होता. यावर निलेश लंके म्हणाले की, अजूनपर्यंत मी कुठे ऐकलं नाही. माझ्या या संबंधित कुठलीही चर्चाही झाली नाही. माझं प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणे झाल्यावरच उत्तर देऊ शकतो. माझं तसं काहीच ठरलेलं नसताना,त्यावर निष्फळ बोलण्यापेक्षा न बोललेलेच बरं, असे निलेश लंके यानी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT