Modi Cabinet Portfolio : मोदी कॅबिनेटच खातेवाटप जाहीर! पाहा संपूर्ण लिस्ट
Porfolio Allocation in Modi Cabinet 3.0 : आज मोदी मंत्रिमंडाळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात अनेक मंत्र्यांकड़े त्यांची जूनीच खाती कायम ठेवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Porfolio Allocation in Modi Cabinet 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी शपथविधी सोहळा पार पडला होता. या शपथविधीनंतर आज मोदी मंत्रिमंडाळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात अनेक मंत्र्यांकड़े त्यांची जूनीच खाती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला कोणतं खातं आलं आहे. हे जाणून घेऊयात. (pm narendra modi cabinet portfolio allocation amit shah nitin gadkari ashwini vaishnav)
ADVERTISEMENT
मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी : अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे..
कॅबिनेट
राजनाथ सिंह - संरक्षण
अमित शहा - गृहमंत्री, सहकार
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास.
जेपी नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते
शिवराज सिंह चौहान - कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास
निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार
एल जयशंकर - परराष्ट्र मंत्रालय
मनोहरलाल खट्टर - गृहनिर्माण आणि नगरविकास, उर्जा
एच डी कुमारस्वामी - अवजड उद्योग आणि पोलाद
पियुष गोयल - वाणिज्य आणि उद्योग
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण
हे वाचलं का?
हे ही वाचा : एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स?
जितनराम मांझी - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग .
राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग - पंचायत राज, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
सर्बानंद सोनोवाल - बंदरे, जहाज आणि जलमार्ग विकास
वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
के राममोहन नायडू - नागरी उड्डाण वाहतूक
प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि अक्षय ऊर्जा
जुआल ओरम - आदिवासी व्यवहार
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग
अश्विनी वैष्णव - रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान
ज्योतिरादित्य शिंदे - दळणवळण आणि ईशान्य राज्यांचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल
गजेंद्रसिंह शेखावत - सांस्कृतिक आणि पर्यटन
अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री
किरेन रिजिजू - संसदीय कामकाज मंत्री; आणि अल्पसंख्याक विकास
हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मनसुख मांडविया - कामगार आणि रोजगार, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री.
जी. किशन रेड्डी - कोळसा आणि खाण
चिराग पासवान - अन्न प्रक्रिया उद्योग
सी आर पाटील - जलशक्ती मंत्री.
हे ही वाचा : मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
राव इंद्रजित सिंग - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), सांस्कृतिक मंत्रालय (राज्यमंत्री)
जितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान मंत्रालय - (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग -राज्यमंत्री)
अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय मंत्रालयाचे (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाज मंत्रालय (राज्यमंत्री)
प्रतापराव जाधव - आयुष मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
जयंत चौधरी - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), शिक्षण (राज्यमंत्री)
ADVERTISEMENT
राज्यमंत्री
जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (राज्यमंत्री)
श्रीपाद नाईक - ऊर्जा, अक्षय ऊर्जा मंत्रालय (राज्यमंत्री)
पंकज चौधरी - अर्थ मंत्रालय (राज्यमंत्री)
कृष्ण पाल - सहकार मंत्रालय (राज्यमंत्री)
रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
रामनाथ ठाकूर - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
नित्यानंद राय - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्रालय (राज्यमंत्री)
व्ही. सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री)
चंद्रशेखर पेमसानी - ग्रामीण विकास, दळणवळण मंत्रालय (राज्यमंत्री)
एस.पी.सिंग बघेल - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायती राज मंत्रालय (राज्यमंत्री)
शोभा करंदलाजे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय (राज्यमंत्री)
कीर्तिवर्धन सिंह - पर्यावरण, वन आणि हवामान बदल, परराष्ट्र मंत्रालय (राज्यमंत्री)
बी. एल. वर्मा - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
शंतनू ठाकूर - बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
सुरेश गोपी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन मंत्रालय (राज्यमंत्री)
डॉ. एल. मुरुगन - माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालय (राज्यमंत्री)
अजय टम्टा - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
बंदी संजय कुमार - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
कमलेश पासवान - ग्रामीण विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
भगीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
सतीशचंद्र दुबे - कोळसा आणि खाण मंत्रालय (राज्यमंत्री)
संजय सेठ - संरक्षण मंत्रालय (राज्यमंत्री)
रवनीत सिंग - अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री)
दुर्गादास उईके - आदिवासी विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
रक्षा निखिल खडसे - युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (राज्यमंत्री)
सुकांता मजुमदार - शिक्षण, ईशान्य राज्यांचे विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
सावित्री ठाकूर - महिला आणि बालविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
तोखान साहू - गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
राज भूषण चौधरी - जलशक्ती मंत्रालय (राज्यमंत्री)
भूपती राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय (राज्यमंत्री)
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
निमुबेन जयंतीभाई बांभनिया - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय (राज्यमंत्री)
मुरलीधर मोहोळ - सहकार, नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालय (राज्यमंत्री)
जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक विकास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (राज्यमंत्री)
पब्रिता मार्गेरिटा - परराष्ट्र, वस्त्रोद्योग मंत्रालय (राज्यमंत्री)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT