Raj Thackeray: मनसैनिक पाहणार आणखी वाट, मनसे लोकसभेच्या रिंगणातून आऊट; राज ठाकरेंनी स्पष्टच..
Raj Thackeray Lok Sabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पण याशिवाय त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 MNS: मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज (9 एप्रिल) मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर पाडवा मेळावा निमित्त जाहीर सभा घेतली. ज्यामध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी त्यांची भूमिका जाहीर केली. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींसाठी महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पण याच राज ठाकरेंच्या निर्णयाचा त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.
राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर करताना असं म्हटलं की, 'माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा.. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा.. पुढच्या गोष्टी पुढे..' म्हणजे याचा अर्थ असा की, मनसे यंदाही लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
हे ही वाचा>> ''उद्धव सारखं मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी मोदींना...'', राज ठाकरे कडाडले!
राज ठाकरेंच्या याच निर्णयाचा मनसेतील अनेक नेत्यांना फटका बसू शकतो. 2019 पासून राज्यातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेल्याने मनसेतील अनेक नेत्यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती. मात्र, राज ठाकरेंच्या निर्णयाने आता त्यांना हादरा बसू शकतो. कारण त्यासाठी त्यांना थेट पाच वर्ष वाट पाहावी लागू शकते..
मनसे आणि लोकसभा निवडणुका..
1. 2009 लोकसभा निवडणूक - मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर 2009 ही त्यांच्यासाठी पहिलीच लोकसभा निवडणूक होती. ज्यामध्य मनसे राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर तुफान प्रचार केला होता. ज्याची परिणिती म्हणून त्यांच्या अनेक मतदारांनी लाखो मतं घेतली होती.










