Ram Satpute : प्रणिती शिंदेंच्या 'उपऱ्या' टीकेला सातपुतेंचं जोरदार प्रत्युत्तर, शिंदेंचाच काढला इतिहास
Ram Satpute vs Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांनी आज सोशल मीडियावर पत्र लिहीत सातपुतेंना शुभेच्छा दिल्या होत्या. या पत्रामुळे स्थानिक विरूद्ध उपरा हा मुद्दा अलगतपणे चर्चेत आला आहे. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांच्या 'उपऱ्या' टीकेला राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
Ram Satpute vs Praniti Shinde : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या आहेत. प्रणिती शिंदे यांनी आज सोशल मीडियावर पत्र लिहीत सातपुतेंना शुभेच्छा दिल्या होत्या. या पत्रामुळे स्थानिक विरूद्ध उपरा हा मुद्दा अलगतपणे चर्चेत आला आहे. त्यामुळे आता प्रणिती शिंदे (praniti shinde) यांच्या 'उपऱ्या' टीकेला राम सातपुते (Ram Satpute) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (ram satpute criticize praniti shinde solapur lok sabha elction 2024 letter war maharashtra politics)
ADVERTISEMENT
राम सातपुते सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात दाखल झाले होते.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राम सातपुते म्हणाले की, सुशील कुमार शिंदे यांनी करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.त्यावेळी ते उपरे नव्हते का? शरद पवार यांनी बारामती येथून येऊन माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.आणि जनतेने सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांना निवडून देखील दिले होते. त्यावेळी ते उपरे नव्हते का असा उपरोधिक टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.
हे ही वाचा : Kiran Mane : 'एकेका जागेसाठीची लाचारी...', किरण मानेची राज ठाकरेंवर टीका
दरम्यान बाहेरील उमेदवार पुन्हा एकदा सोलापूरला मिळाला असा प्रश्न विचारताच राम सातपुते म्हणाले, सोलापूरच्या विविध साखर कारखान्याशी निगडित मी ऊसतोड केली आहे.माझ्या आई वडिलांनी या सोलापुरात सालगडी म्हणून काम केलं आणि मी देखील जनतेचा सालगडी म्हणून सेवा करेन अशी ग्वाही राम सातपुते यांनी दिली.
हे वाचलं का?
खासदारकीला सुशीलकुमार शिंदेचा दोन वेळा पराभव झाला होता, त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांचा एकदा पराभव झाला.असे तीन वेळा पराभव झालेल्या शिंदे परिवाराला पुन्हा चौथ्यावेळी धूळ चारु, असे म्हणत राम सातपुते यांनी शिंदे परिवाराला आव्हान दिले आहे.
हे ही वाचा : Sharmila Pawar : ''मुखातून श्रीराम म्हणतोय, घरात महाभारत चाललंय''
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT