Kiran Mane : 'एकेका जागेसाठीची लाचारी...', किरण मानेची राज ठाकरेंवर टीका
Kiran Mane Social Media Post : 'सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं', अशा शब्दात किरण माने यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT

Kiran Mane Social Media Post : महायुतीत मनसेच्या रूपात चौथा भिडू दाखल होणार आहे. सध्या जागावाटपाच घोड अडल्याने हा भिडू वेट अॅड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यात आता ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. 'सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं', अशा शब्दात किरण माने यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे. (shiv sena thackeray group leader kiran mane social post mns raj thackeray)
किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमधून किरण माने यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
किरण मानेंची पोस्ट जशीच्या तशी
उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'कॉपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.
समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.










