Lok Sabha 2024 : महाराष्ट्राआधी एनडीएचे बिहारमध्ये जागावाटप, भाजपला किती?
Bihar: Seats divided in NDA, BJP-17, JDU-16 will contest elections : एनडीएने बिहारमधील जागावाटपाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक निवडणूक २०२४
बिहारमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची घोषणा
भाजप बिहारमध्ये लढवणार १७ जागा
Bihar Lok Sabha Seats Sharing : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप झाले आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) पाच जागा देण्यात आल्या आहेत. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी एनडीए नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन जागांची घोषणा केली.
ADVERTISEMENT
ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 17 जागांवर, तर नितीश कुमार यांची जेडीयू 16 जागांवर निवडणूक लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाला 5 जागा, मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला (HAM) पक्षाला 1 जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात पशुपती पारस यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी पारस यांनी बंडखोरीचे संकेत दिले होते आणि त्यांच्यासमोर पर्याय खुले असल्याचे सांगितले होते.
हे वाचलं का?
या जागांवर भाजप लढवणार निवडणूक
पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, मधुबनी, दरभंगा, मुझफ्फरपूर, महाराजगंज, सारण, उजियारपूर, बेगुसराय, नवादा, पटना साहिब, पाटलीपुत्र, अराह, बक्सूर, सासाराम आणि अररिया.
या जागा मिळाल्या जेडीयूला
वामिकी नगर, सीतामढी, झांझारपूर, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, जेहानाबाद आणि शिवहर.
ADVERTISEMENT
चिराग पासवान यांना कोणत्या जागा?
वैशाली, हाजीपूर, समस्तीपूर, खगरिया आणि जमुई
ADVERTISEMENT
जीतन राम मांझी यांचा पक्ष गया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. त्याचप्रमाणे उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष करकट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
बिहारमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत
बिहारमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारच्या 4 जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 5-5 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय सहाव्या आणि सातव्या टप्प्यात 8-8 जागांवर मतदान होणार आहे.
एनडीएने 2019 मध्ये जिंकल्या होत्या 39 जागा
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए (भाजप, जेडीयू आणि एलजेपी) ने दणदणीत विजय मिळवला होता. एनडीएने बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या, तर महाआघाडीच्या खात्यात फक्त एक किशनगंजची जागा आली होती. ज्यावर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT