Maratha Morcha : मराठा समाजाच्या बैठकीत तुफान राडा का झाला? वाचा Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मंदिरात बैठक बोलवण्यात आली.
मराठा समाजाच्या बैठकीत वाद का झाला?
social share
google news

Maratha Morcha chhatrapati sambhajinagar : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या नावासंदर्भात गाव पातळीवर बैठका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही बैठक बोलवण्यात आली होती, पण यावेळी तुंबळ हाणामारी झाली. विकी पाटील नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. हा वाद का उफाळून आला, त्याचे कारण समोर आले आहे. (Why did happen clashes in maratha community meeting)

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मंदिरात बैठक बोलवण्यात आली. आज (२९ मार्च) ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू झाली.

हेही वाचा >> 'या' एका जागेमुळे ठाकरे-शिंदेंची वाढली कटकट!

या बैठकीला 60 ते 70 मराठा समुदायातील महिला आणि पुरुष उपस्थित होते. बैठक सुरू झाली. चर्चा सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोप झाले आणि एका व्यक्तीला काही जणांनी मारहाण केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठा समाज बैठकीत वाद का झाला?

बैठकीत असं ठरलं होतं की, कुणीही कुणाचं नाव घ्यायचं नाही. काही मतभेद निर्माण झाले, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं. पण, एका व्यक्तीने चंद्रकांत खैरे यांचे नाव घेत आरोप केला. त्यानंतर ज्याच्यावर हा आरोप करण्यात आला. त्याला जाब विचारताना वाद वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.

हेही वाचा >> 'वंचित' वसंत मोरेंना पुण्यातून देणार लोकसभेची उमेदवारी?

यासंदर्भात बैठकीला हजर असलेल्या व्यक्तीने सांगितलं की, "आम्हाला काही व्यक्तींकडून माहिती मिळाली होती की, हा सुपारी घेऊन आला आहे. आम्ही त्याला जाब विचारला. जाब विचारत असताना त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यात खाली बसलेल्या कुणीतरी चंद्रकांत खैरेचं नाव घेतलं आणि सांगितलं की पैसे घेऊन पाठवण्यात आले आहे. पण, आम्ही त्याला जबाब विचारला की, हे खरं आहे का? तो खाली बसून बोलत होता. त्यातून हे घडलं." 

ADVERTISEMENT

मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीने सांगितलं की, "आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. या प्रस्थापित लोकांनी थेट मारहाण सुरू केली. दबाव तयार करत आहेत. आम्ही गरजवंतांची नावे टाकत होतो. ही यादी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवायची होती. यांनी मारहाण केली." 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT