Uddhav Thackeray : "मोदींसोबत मैत्रीपेक्षा शत्रुत्व फायद्याचे, कारण...", ठाकरेंचे वर्मावर बाण
Uddhav Thackeray Narendra Modi : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोदींवर टीकास्त्र डागले आहे. मोदी हे संकटात मदत करणाऱ्या मित्रांनाच संपवतात, असे ठाकरेंनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोदींवर टीका
लोकसभा निवडणूक निकालावर शिवसेनेचे भाष्य
मोदी मित्रांनाच संपवतात, अशी ठाकरेंनी टीका केली
Maharashtra Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी आणि भाजपवर हल्ला चढवल्याचे दिसत आहे. 370 जागा मिळवण्याची घोषणा देणाऱ्या भाजपला 240 पर्यंतच मजल मारता आली असून, यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींच्या वर्मावर बोट ठेवले आहे. भटकती आत्मा असे संबोधत ठाकरेंच्या सेनेने काय म्हटलंय? (Uddhav Thackeray has criticized that Modi kills friends who help him)
सामना अग्रलेखातून शिवसेनेने (UBT) मोदी आणि भाजपच्या निकालावर भाष्य केले आहे.
भटकता आत्मा लटकतोय
"भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.
"मोदी हे आता त्यांच्या ब्रॅण्डचे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत, तर त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला. मोदी सरकार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकीन है, मोदी तो भगवान है, अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली", अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने टीकेचे बाण डागले आहेत.
मोदींना राम पावला नाही -ठाकरे
"मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले", असेही ठाकरेंनी म्हटले आहे.










