Vidhan Parishad Election : महायुतीत 'बिघाडी'! उद्धव ठाकरे-काँग्रेसने घेतले जुळवून
Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने पुन्हा एकदा एकी दाखवली असून, दोन मतदारसंघामध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधान परिषद निवडणूक २०२४

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने घेतले जुळवून

भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस लढत
Vidhan Parishad Election 2024 : रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. २६ जून रोजी मतदान होत असून, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने जुळवून घेतले. मात्र, महायुतीतील दोन पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. (Maharashtra Vidhan Parishad Elecitons 2024 Latest news)
महाविकास आघाडीने कसं जुळवून आणलं गणित?
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमत होणार की नाही, याकडे लक्ष होते. पण, दोन्ही पक्षांनी जुळवून घेतले.
उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार किशोर जैन यांची उमेदवारी मागे घेतली. तर काँग्रेसने नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार दिलीप पाटील यांची उमेदवारी मागे घेतली.
हेही वाचा >> काही झालं तरी महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची -शरद पवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमित सरैया यांनी उमेदवारी मागे घेतली. मुंबई शिक्षक मतदारसंघातूनही काँग्रेसच्या प्रकाश सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने मविआतील वाद मिटला.