Uddhav Thackeray : ठाकरे कडाडले! ''देवेंद्र फडणवीस म्हणजे उत्तम घरफोड्या''

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray criticize devendra fadnavis on ncp shiv sena break maharashtra politics hingoli news
'देवेंद्र फडणवीस तुमचं नाव देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात उत्तम घरफोड्या झाल्याशिवाय राहणार नाही'
social share
google news

Udhhav Thackeray criticize Devendra Fadnavis :  ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : 'मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन. त्याला अडीच वर्ष लागली. परंतू अडीच वर्षांनी आलो तर असा आलो की दोन्ही पक्ष फोडून आलो',असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा समाचार आता ठाकरेंनी घेतला आहे. 'देवेंद्र फडणवीस तुमचं नाव देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात उत्तम घरफोड्या झाल्याशिवाय राहणार नाही', असा टोला ठाकरेंनी (Udhhav Thackeray)  फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला आहे.  (udhhav thackeray criticize devendra fadnavis on ncp shiv sena break maharashtra politics hingoli news) 

उद्धव ठाकरे हिंगोलीत बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला तर उप मुख्यमंत्रीपद. पण 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप मी नाही केला. माझ्यासोबतही ते उपमुख्यमंत्री म्हणून बसायचे. हा आरोप मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि तुम्हीच सांगितलेले तुमचं सरकार आल्यावर अजितदादांना चक्की पिसिंग करायला लावू. पण आरोप करायचा, पक्ष फोडायचा आणि स्वत:च्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि भ्रष्टाचाऱ्यासोबत बसून राज्य चालवायचं, अशी टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली. 

हे ही वाचा : Vijay Shivatare : '...तर मी पक्ष सोडेन, राजीनामा देऊन टाकेन'

ठाकरे पुढे म्हणाले की, आता पंचायत अशी झालीय, मी भाषणाची सुरूवात कशी करावी. हे आता मला मिंधे शिकवायला लागले आहेत. इंडिया आघाडीच्या भाषणाची सुरुवात मी देशभक्त म्हणून केली. माझ्या अशा भाषणाच्या सुरुवातीने नमो सैनिकांच्या पोटात दुखलंय, मोदी भक्त आंधळे झालेत, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली आहे. पण आम्ही देश भक्त आहोत आणि देश भक्तचं राहू. तुम्हाला मोदींच्या भक्तीने जे भोगायचं ते भोगा, असे ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला गद्दारांना विचारायचंय, तुम्हाला मी काय नाही दिलं, आमदार केलं, खासदार केलं, भंगार यायचे आणि म्हणायचे वाचवा वाचवा..मी वाचवलं पण मला माहित नव्हत हा आकडेबाज आहे. तुम्हाला माहिती नव्हतं का हे असे आहेत, मला खरंच माहिती नव्हतं. मी शिवसैनिक म्हणून प्रोत्साहन देण माझं काम होतं. पण मी मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्र लुटू दिला नाही, असे ठाकरेंनी यावेळी स्पष्ट सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha : राज ठाकरेंची दिल्लीवारी, भाजपसमोर ठेवणार 'या' दोन जागांचा प्रस्ताव

महाराष्ट्रात मोदी, अमित शाह येतात, पण संकट काळात तुम्ही आलात का? राज्यात जेव्हा शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा आलात का ? मोदीजी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात का? येथील शेतकऱ्यांनी काय घोड मारलंय. तीन उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेलात, महाराष्ट्राने काय केलंय.पण महाराष्ट्र विषयी पोटसूळ का? असा खरमरीत सवाल ठाकरेंनी मोदींना केला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT