Shiv Sena UBT : "अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले", ठाकरेंनी घेरलं
Uddhav Thackeray on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी-अंबानी यांचा उल्लेख करत केलेल्या विधानावरून ठाकरेंच्या शिवसेनेने पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान मोदींवर ठाकरेंचं टीकास्त्र

अदानी-अंबानींकडून काँग्रेसने पैसे घेतल्याच्या विधानावरून वादंग

शिवसेनेने सामना अग्रलेखातून साधला निशाणा
Shiv Sena UBT on PM Modi : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. "मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला असून, मोदी यांचे वक्तव्य पाहून त्यांच्या या उद्योगपती मित्रांनाही वाटले असेल मूर्ख मित्रापेक्षा बुद्धिमान शत्रू बरा", असा निशाणा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून साधला आहे. (Uddhav Thackeray's Shiv Sena has commented that Rahul Gandhi has defeated Prime Minister Modi in Lok Sabha campaign)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी अदानी-अंबानी यांचा उल्लेख करत काँग्रेसवर पैसे घेतल्याचा आरोप केला. हा मुद्दा प्रचारात गाजत असून, आता ठाकरेंच्या शिवसेनेने यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.
शिवसेनेने अग्रलेखात काय म्हटलंय? वाचा प्रमुख मुद्दे...
1) "नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील. ते झोला घेऊन हिमालयात जातील, की त्यांनी व अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही; पण मोदी जाता जाता जी भाषणे आणि वक्तव्ये करीत आहेत ती त्यांच्या निराश-हताश मानसिकतेची लक्षणे आहेत."
2) "मोदी यांनी स्वतःला प्रचारात गुंतवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे. तेलंगणातील एका प्रचार सभेत मोदी यांनी त्यांच्या प्रिय अंबानी-अदानींचा उल्लेख केला. 'अंबानी-अदानीने काँग्रेसला पोते भरून काळा पैसा पाठवलाय व आता काँगेसचे शहजादे अंबानी-अदानीचे नाव घेत नाहीत.' यावर राहुल गांधी यांनी त्यांच्या पद्धतीने मार्मिक उत्तर मोदींना दिले."