Maharashtra Lok Sabha : आदित्य ठाकरेंनी कल्याण किंवा ठाण्यातून निवडणूक का लढवली नाही?
Aaditya Thackeray Latest News : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना ठाण्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान देते होते, पण लोकसभेच्या निमित्ताने संंधी असूनही रिंगणात का उतरले नाही?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबद्दल मांडलं मत
आदित्य ठाकरे कल्याण वा ठाण्यातून निवडणूक लढवण्याबद्दल काय बोलले?
एकनाथ शिंदेंना दिले होते आव्हान
Aaditya Thackeray Lok Sabha Election : एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी आणि काही खासदारांनी बंडखोरी केल्यापासून आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहेत. शिंदेंनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून निवडणूक लढतो किंवा त्यांनी वरळीतून लढावी, असे आदित्य ठाकरे म्हणतात. श्रीकांत शिंदेंनीही आदित्य ठाकरेंना कल्याणमधून लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. हाच प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते काय म्हणाले? (Why did Aditya Thackeray not contest from Kalyan Lok Sabha or Thane Lok Sabha constituency?)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरेंनी लोकमत वृत्तपत्राला मुलाखत दिली. ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला उभे का राहिला नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
आदित्य ठाकरेंनी काय दिले उत्तर?
या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "पिक्चर अभी बाकी है! लोकसभा हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही तिथे जे बोलता ते देशभर जाते. मात्र, त्याच बरोबरीने आपला महाराष्ट्र आहे. सध्याच्या स्थितीत तरी महाराष्ट्रात मी काम करणे योग्य आहे."
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवार महायुतीच्या प्रचारातून गायब, गेले कुठे?
"कारण या लोकांनी ज्या प्रकारे मागील अडीच वर्षात महाराष्ट्र मागे नेला आहे. आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही जबाबदारी मिळेल, ती आमदार म्हणून असेल किंवा इतर काही... त्या माध्यमातून मला महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशभर पोहोचवायचा आहे", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> 'मुर्खपणाचे स्टेटमेंट', मोदींच्या 'त्या' विधानावर पवार भडकले
"कोर्टाकडून बाद झाले नाहीत, तर एकनाथ शिंदेंना निवडणूक लढता येईल. भाजप जर डोक्यावर बसले नाही, तर निवडणूक राज्यात होईल. पहिले चॅलेंज देतो की, माझ्याशी महाराष्ट्राबद्दल चर्चा करा. जिथून लढवायची तिथून निवडणूक लढवू", असे उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले.
ADVERTISEMENT
"तुम्ही भाजपलाच संपवले", आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, "पंकजाताईंना आता उमेदवारी दिली. तरीही त्यांच्या मनात काय खदखद आहे, हे त्यांनी विचारा. पूनमताई कुठे आहेत, ते विचारा. प्रकाश मेहता कुठे आहेत. राज पुरोहित कुठे आहेत. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय केले? दोन पक्ष संपवून मी आलो, असे तुम्ही (देवेंद्र फडणवीस) म्हणालात, पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवले", असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ!
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "मूळ भाजप आता कुठे आहे? आताच्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत, ते २०२२ मध्ये आयात केलेले आहेत. त्यांच्यासोबत १० आमदार मंत्री झाले. अजित पवारांसोबत ९ आमदार मंत्री झाले. भाजपचे १० मंत्री आहेत, पण त्यातलेही फक्त ६ मूळ भाजपचे आहेत. स्वतःच्या इगोसाठी आमचे सरकार पाडले, पण भाजपचे मूळ कार्यकर्ते कुठे आहेत?", असा सवालही ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT