कंगना म्हणते, 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कोणाला टोमणा मारल्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात ट्विट केल्याने कंगना चर्चेत आली आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर कंगनाने हे ट्विट केलंय. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “सस्पेंड होण्याच्या किंमतीवर मी जाहिरपणे सांगू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कोणाला टोमणा मारल्यामुळे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात ट्विट केल्याने कंगना चर्चेत आली आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर कंगनाने हे ट्विट केलंय. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “सस्पेंड होण्याच्या किंमतीवर मी जाहिरपणे सांगू इच्छिते की 2024 सालामध्ये देखील पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनतील.”

2014 साली नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपची पुन्हा सत्ता आली आणि पंतप्रधान पदी मोदींची दुसऱ्यांदा वर्णी लागली. तर आता 2024 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान बनणार असं अभिनेत्री कंगणा राणावतने म्हटलंय.

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच थलायवी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कंगना माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने या सिनेमातील तिला एक लूक पण शेअर केला होता. याशिवाय कंगना सध्या धाकड या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp