Chandrayan 3 Prakash Raj tweet : चांद्रयान-3 वर ‘चायवाला’च्या जोकमुळे ट्रोल झालेल्या प्रकाश राजने लँडिंगनंतर केलं ‘हे’ ट्वीट
देशातील चांगल्या वाईट घटनांवर व्यक्त होणारा, क्रिया-प्रतिक्रिया देणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांनी आता पुन्हा एकदा चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर आता पुन्हा एकदा ट्विट केले आहे. इस्त्रोचे अभिनंदन करत त्यांनी ट्रोल्सनाही त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

prakash raj chandrayan 3 tweet : चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाल्यानंतर देशासह जगभरातून भारताचे कौतुक झाले. या कौतुकमध्ये भर टाकली ती अभिनेता प्रकाश राज यांनी म्हटले आहे की, या मोहिसाठी फक्त भारतच नाही तर मानवतेसाठीही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. त्याच बरोबर ज्यांनी ज्यांनी ही मोहिमे यशस्वी होण्यासाठी योगदान दिले आहे, त्या सर्वांचे आभारही मानले आहेत. चांद्रयान-3 मिशनवर या आधी ट्विट केल्यानंतर प्रकाश राज यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
मानवतावतेसाठी मोठी गोष्ट
चंद्रावर विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर प्रकाश राज यांनी म्हटले आहे की, भारत आणि मानवतेसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच बरोबर इस्त्रो, चंद्रयान आणि विक्रम लँडरच्या यशस्वी योगदानासाठी ज्यांचे योगदान लाभले आहे. त्या सर्वांचे आभार. कारण आता या यशस्वी मोहिमेमुळे आपल्या सगळ्यांनाच ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय, तिथं घडणाऱ्या महत्वाच्या घटना घडामोडी आपल्याला कळणार आहेत.
PROUD MOMENT for INDIA and to Humankind.. 🙏🏿🙏🏿🙏🏿Thank you #ISRO #Chandrayaan3 #VikramLander and to everyone who contributed to make this happen .. may this guide us to Explore and Celebrate the mystery of our UNIVERSE .. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) August 23, 2023