अमेरिकन पॉप गायक निक जोनसने परिधान केला सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट, फोटो व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूरची चादर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे.मात्र आता ही चादर जगभरात पोहोचलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.अमेरिकन गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याने याच सोलापुरी चादरपासून बनवण्यात आलेला ड्रेस परिधान केलाय.

स्वत: निक जोनस याने या सोलापुरी चादरीच्या शर्टमध्ये घातलेले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सेंट लुईसमध्ये झालेल्या कार्य़क्रमात या कपड्यांनी उब दिली असे म्हणत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत दिसणाऱ्या कपड्यात सोलापुरातील चाटला टेक्स्टाईल इंडिस्ट्रीजचा लोगो प्रिंट करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना चाटला टेक्सटाइल इंडस्ट्री चे गोवर्धन चाटला म्हणाले , चाटला टेक्स्टाईल इंडस्ट्रिजमध्ये दरवर्षी फॅशन डिजाईन शिकणारे विद्यार्थी इंटनर्शिपसाठी येत असतात. तसेच देशभरात देखील चादरचे डिलर आहेत.त्यांच्यामाध्यमातून ही चादर निक यांच्यापर्यंत पोहोचली असावी अशी माहिती गोवर्धन चाटला यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चाटला टेक्सटाईल गेल्या सहा दशकांपासून सोलापूरमध्ये चादर व्यवसायात आहे. या व्यवसायाची सुरूवात गोवर्धन चाटला यांच्या आजोबांनी केली. त्यांच्या आजोबांपासून चादरींची निर्मिती करणं हा त्यांचा व्यवसाय आहे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यात आम्ही या सोलापुरी चादरी पोहचवल्या आहेत. निक जोनास यांनी सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट घातल्याचे फोटो आम्ही पाहिले आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि अभिमानही वाटला. आमच्या डीलरच्या माध्यमातून ही चादर आणि त्याचा शर्ट त्यांच्या मार्फत पोहचला असू शकतो असंही गोवर्धन यांनी सांगितलं. आम्हाला सोलापूरकर म्हणून याबाबत अभिमान वाटतो असंही गोवर्धन चाटला यांनी मुंबई तकला सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

इंस्टाग्रामवर निक जोनासने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये जो शर्ट निक जोनासने घातला आहे. हा शर्ट घालून आपल्याला खूपच उबदार आणि छान वाटल्याचं निक जोनासने म्हटलं आहे. निक जोनासचे हे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहेत. अन

निक जोनासने घातलेल्या या शर्टची इंस्टाग्रामवर चांगलीच चर्चा होते आहे. ही सोलापुरी चादर आहे असं अनेकांनी त्याच्या फोटोंवर कमेंट करून सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT