बिग बी यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर म्हणाले…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समोर आल्यावर फॅन्स धास्तावले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता बिग बी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी फॅन्सचे आभार मानलेत. अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ब्लॉगद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणालेत, “माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी तसंच प्रेमासाठी धन्यवाद…या वयात […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं समोर आल्यावर फॅन्स धास्तावले होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता बिग बी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी फॅन्सचे आभार मानलेत.
अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ब्लॉगद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणालेत, “माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी तसंच प्रेमासाठी धन्यवाद…या वयात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं नाजूक असतं. आशा करतो लवकरच सर्व काही ठीक होईल.” या ब्लॉगसोबत अमिताभ यांनी त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या कानावर पट्टी दिसून येतेय.