सलमान खानला डेंग्यूची लागण! करण जोहरच्या हाती बिग बॉसची सूत्रं

मुंबई तक

अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सलमान खानची प्रकृती बिघडली आहे. डेंग्यू झाल्याने सलमान खानने त्याचं सगळं शुटिंग बंद केलं आहे. सलमान खानला डेंग्यू झाल्याची बातमी ऐकून फॅन्स काळजीत पडले आहेत. सलमान खानला डेंग्यूची लागण सलमान खानला डेंग्यूची लागण झाली आहे. रिपोर्ट्स नुसार सलमान खान गेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सलमान खानची प्रकृती बिघडली आहे. डेंग्यू झाल्याने सलमान खानने त्याचं सगळं शुटिंग बंद केलं आहे. सलमान खानला डेंग्यू झाल्याची बातमी ऐकून फॅन्स काळजीत पडले आहेत.

सलमान खानला डेंग्यूची लागण

सलमान खानला डेंग्यूची लागण झाली आहे. रिपोर्ट्स नुसार सलमान खान गेल्या काही दिवसांपासून किसी का भाई किसी की जान या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. मात्र याच दरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाली आहे. सलमान खानची प्रकृती बिघडल्याने सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

सलमान खान बिग बॉसचा शो होस्ट करणार नाही

टीव्हीवरचा सर्वात मोठा शो अशी ओळख असलेला बिग बॉस हा शोही सलमान खान होस्ट करू शकणार नाही. वीक एंड का वार या वीक एंडच्या एपिसोडमध्ये सलमान खान सगळ्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो. मात्र आता सलमानला डेंग्यू झाल्याने ही धुरा करण जोहरच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. येणाऱ्या वीक एंड का वार मध्ये सलमान खान ऐवजी करण जोहर असणार आहे. वीक एंड का वारचा प्रोमोही आला आहे ज्यामध्ये करण जोहर सगळ्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो आहे.

करण जोहर होस्ट करणार बिग बॉस

टीव्हीवरचा लोकप्रिय शो बिग बॉस याचा सध्या सोळावा सिझन सुरू आहे. या शोमध्ये सलमान खान दिसणार नाही. सलमानला डेंग्यू झाल्याने त्याची जागा आता करण जोहरने घेतली आहे. येत्या आठवड्यातला वीक एंड का वार या बिग बॉसमध्ये होस्ट म्हणून सलमान ऐवजी करण जोहर दिसणार आहे. या शोचा प्रोमोही आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp