Bollywood Celebrities Died in 2022: बॉलिवूडने गमावले 'हे' सुप्रसिद्ध कलाकार

बॉलिवूडसाठी हे वर्ष जितके चांगले ठरले तितकेच दु:खदही होते. कारण, अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना बॉलिवूडने या वर्षभरात गमावलं आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Bollywood Celebrities Died in 2022
Bollywood Celebrities Died in 2022

Bollywood Celebrities Died in 2022: मुंबई: कोरोना महामारी काळानंतर 2022 या वर्षी प्रत्येकाने नव्याने सुरूवात केली. त्यामुळे हे वर्ष सर्वांसाठीच खास ठरले. बॉलिवूडचे अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित न होता चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होऊ लागले. बॉलिवूडसाठी हे वर्ष जितके चांगले ठरले तितकेच दु:खदही होते. कारण, अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना बॉलिवूडने या वर्षभरात गमावलं आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित बिरजू महाराज, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला.

सुप्रसिद्ध कलाकारांचे निधन हे सर्वांसाठी खूपच दु:खापेक्षा कमी नव्हते. या कलाकारांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले. मृत्यू ही वस्तुस्थिती आहे. पण अकाली मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी बरंचसं दु:खद ठरलं.

2022 मध्ये बॉलिवूडने गमावले 'हे' दिग्गज कलाकार

लता मंगेशकर

भारतरत्न आणि गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध लता मंगेशकर यांचे या वर्षी निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम या आजाराशी त्या झुंज देत होत्या. 6 फेब्रुवारी 2022 ही घटना घडली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे भारतीय कलाकार क्षेत्रातील एक अनमोल हिरा हरपला आहे.

पंडित बिरजू महाराज

कथ्थक नर्तक, संगीतकार आणि गायक पंडित बिरजू महाराज यांचे या वर्षी जानेवारीत निधन झाले. 16 जानेवारी 2022 रोजी, त्यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या वाढदिवसाच्या अगदी एक महिना आधी, त्यांच्या दिल्लीतील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.

बप्पी लाहिरी

बप्पी लाहिरी हे एक नावाजलेले गायक तर होतेच परंतु, त्यांना गोल्ड मॅन म्हणूनही ओळखलं जायचं. बप्पी दा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार होते. 15 फेब्रुवारी 2022 रोजी बप्पी दा यांचे मुंबईत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे निधन झालं होतं. संगीतासोबतच बप्पी दा यांनी राजकारणातही रस होता.

राजू श्रीवास्तव

कॉमेडी किंग सत्य प्रकाश श्रीवास्तव म्हणजेच राजू श्रीवास्तव ज्यांनी आपल्याला भरभरून हसवले, यांनी वयाच्या 58व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. जिममध्ये व्यायाम करत असतानाच राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अनेक दिवस ते रूग्णालयात जीवन-मरणाशी झुंज देत होते. काही दिवस ते कोमामध्येही होते. अखरे 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचं निधन झालं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in