दीपिका पदुकोणची रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर पहिली प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली....

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची चर्चा होत असतानाच दीपिकाने याबाबत खास प्रतिक्रिया दिली आहे
Deepika Padukone's first reaction to Ranveer's nude photoshoot, says “Before posting these photos
Deepika Padukone's first reaction to Ranveer's nude photoshoot, says “Before posting these photos

अभिनेता रणवीर सिंग हा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्याचं कारण ठरलं आहे त्याने शेअर केलेले न्यूड फोटो. पेपर या मॅगझिनसाठी त्याने हे फोटो काढले आहेत. आता या सगळ्या प्रकरणावर त्याची पत्नी दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दीपिका पदुकोण याबाबत काय म्हणाली आहे ते चर्चेत आहे.

रणवीरचं न्यूड फोटोशूट चांगलंच चर्चेत

अभिनेता रणवीर सिंग जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत राहतो, त्यापेक्षा जास्त चर्चा असते त्यांच्या फॅशन सेन्सची. यावेळी रणवीर सिंग सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याने केलेलं न्यूड फोटोशूट! बॉलिवूडमधील उत्साही अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंगने मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी काहीतरी हटके गोष्टी करून चाहत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. नेहमी वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या रणवीर सिंग यावेळी जे केलंय, त्याची कुणी कल्पनाही केली नसेल आणि त्यामुळेच लोक त्यावरून जोक करत आहेत. मात्र महत्त्वाचं आहे ते दीपिका पदुकोणचं म्हणणं.

रणवीरच्या न्यूड फोटोंबाबत काय म्हटलंय दीपिका पदुकोणने?

रणवीरचे हे फोटो पाहून मी खूपच इंप्रेस झाले. मला या फोटोशूटची संकल्पना आवडली होती. रणवीरने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मला ते फोटो आवडले होते. हे दीपिका पदुकोणने म्हटलं आहे. दीपिका पदुकोणच्या या वक्तव्यानंतर त्याची खूप चर्चा होते आहे.

दीपिका पदुकोणनंतर या फोटोशूटबद्दल रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेकडेही प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने हे सांगितलं की रणवीरचे असे फोटोशूट होणार आहेत त्याचं नियोजन आधीच झालं होतं. रणवीर सिंगला या शूटबद्दल सर्वकाही स्पष्टपणे माहिती होते. तो ते करण्यास फार उत्सुक होता. रणवीर हा दररोज विविध फॅशनचे कपडे परिधान करत असतो. त्याच्या निवडीबद्दल चाहतेही त्याचे कौतुक करतात. त्यामुळे रणवीरने न्यूड फोटोशूट करणं ही इतकी मोठी बाब नक्कीच नाही. तो नेहमीच नवनवीन गोष्टी करण्यासाठी फारच उत्साही असतो, असंही या व्यक्तीने सांगितलं.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरील व्हायरल मीम्स

रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूटवरून आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होतं असून, यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर व्यक्त होत आहे. तुम्ही कपड्यांवरून हसत होता, आता काय कराल, असं एका यूजरने रणवीर सिंगचा फोटो शेअर करत म्हटलंय.

रणवीर सिंगच्या या फोटोशूटचं कौतुक होत असताना आता बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने जळजळीत सवाल केलाय. रणवीर सिंगऐवजी एखाद्या महिलेनं जर असं फोटोशूट केलं असतं, तर काय केलं असतं? असा सवाल तिने रणवीर सिंगच्या फोटोशूटचं कौतुक करणाऱ्यांना केलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in