Hiramandi: पाकमधील ‘हिरामंडी’ काय? ज्यावर आहे भन्साळीची वेब सीरिज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay leela bhansali Web series Hiramandi : चित्रपटसृष्ठीत संजय लीला भन्साळी हे नाव गाजलेलं आहे. भन्साळी हे जबरदस्त चित्रपट बनवण्यासाठी (making great movies ) ओळखले जातात. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये केवळ भव्य आणि महागडे सेटच नाहीत तर ऐतिहासिक आणि अनोख्या कथाही (unique and historical stories ) पाहायला मिळतात. चित्रपटांव्यतिरिक्त संजय लीला भन्साळी ‘हिरामंडी’मधून डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. (Sanjayleela bhansali ready to enter ott with Hiramandi) सध्या या सिरीजचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. OTT प्लॅटफॉर्मवर ‘हिरमंडी’ला पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. त्याआधी जाणून घेऊया काय आहे ‘हिरमंडी’ची कथा. What is story of hiramandi?

ADVERTISEMENT

Shraddha Murder श्रद्धाप्रमाणेच Dexter वेबसीरिज पाहून जगभरात झाल्या आहेत ‘इतक्या’ हत्या

हिरामंडीची कथा काय?

‘हिरामंडी’ हा पाकिस्तानातील लाहोर येथे स्थित एक रेडलाइट क्षेत्र आहे, ज्याला ‘शाही मोहल्ला’ म्हणूनही ओळखले जाते. फाळणीपूर्वी ‘हीरामंडी’च्या गणिका देशभर प्रसिद्ध होत्या. त्याकाळी राजकारण, प्रेम, फसवणूक हे सर्व वेश्यालयात दिसत होते. मुघल काळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील महिलाही ‘हिरामंडी’मध्ये राहायला आल्या होत्या. त्यावेळी तवायफ हा शब्द घाणेरड्या डोळ्यांनी पाहिला जात नव्हता. मुघल काळात गणिका संगीत, कला, नृत्य आणि संस्कृतीशी संबंधित होत्या. हा तो काळ होता जेव्हा गणिका फक्त राजे आणि सम्राटांचे मनोरंजन करत असत.

हे वाचलं का?

हळूहळू काळ बदलला, मुघल काळ संपुष्टात येऊ लागला आणि ‘हिरमंडी’वर परकीयांचे आक्रमण झाले. इंग्रजांच्या राजवटीत हिरामंडीची चमक ओसरू लागली. एवढेच नाही तर इंग्रजांनी ‘हिरामंडी’च्या गणिकांचं नावही वेश्या असं ठेवलं. हिरामंडीची चकाकी इतकी फिकी पडली की आजतागायत त्या परिसराची चमक परत आली नाही. स्वातंत्र्यानंतर सरकारनेही येथे येणाऱ्या लोकांसाठी अनेक उत्तमोत्तम व्यवस्था केल्या, पण तरीही त्याचा उपयोग झाला नाही.

Smriti Irani यांच्या लेकीच्या रिप्शेनशला ‘पठाण’ची हजेरी! Exclusive Photo…

ADVERTISEMENT

हिरामंडी हे नाव कसं पडलं?

शीख महाराजा रणजित सिंग यांचे मंत्री हीरा सिंग डोगरा यांच्या नावावरून ‘हिरामंडी’ हे नाव ठेवण्यात आले होते, असे मानले जाते. ‘हिरा सिंह’ यांनीच येथे धान्य बाजार बांधला, त्यानंतर या जागेचे नाव ‘हिरामंडी’ नाव ठेवण्यात आले. करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात पहिल्यांदा ‘हिरामंडी’चा उल्लेख करण्यात आला होता. पूर्वीच्या तुलनेत शाही मोहल्ला आता शाही राहिलेला नाही. दिवसा ते सामान्य बाजारपेठेसारखे दिसते, परंतु संध्याकाळ होताच ‘हिरमंडी’ रेड लाइट एरियामध्ये बदलते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT