स्वेटर नाही आता रेनकोट वापरा! राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई तक

maharashtra weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 25 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडं हवामान तर काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

point

25 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 25 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर दिवाळी सण संपला तरीही काही ठिकाणी पावसाची परिस्थितीची कायम राहण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया 25 ऑक्टोबर रोजी हवामानाचा एकूण अंदाज हा पुढीलप्रमाणे जारी करण्यात आलेला आहे. 

हे ही वाचा : फलटणमधील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आतेभावाने फोडलं बिंग, घटनेचे धागेदोरे बड्या नेत्याशी?

कोकण विभाग : 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह  हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. यापैकी धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे,  सातारा, सांगली आणि सोलापूरात पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. इतर जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा विभाग : 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यात तरुळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. याच जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यात हवामान विभागाने हलका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp