Aishwarya Rai Video : घटस्फोटाच्या चर्चेत 'बच्चन' आडनाव लावण्यावरून ऐश्वर्या काय म्हणाली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aishwarya rai reaction on being called rai bachchan interview video viral in social media abhishe bachhan divorce rumour
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऐश्वर्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

point

ऐश्वर्या बच्चन आडनावावरून आक्षेप घेतल्याचे दिसत आहे.

point

व्हिडिओने पुन्हा खळबळ माजली आहे.

Aishwarya Rai Reaction on Being called Rai Bacchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bacchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. या चर्चांवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे. मात्र या सर्वात आता ऐश्वर्याचा (Aishwarya Rai)  एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या बच्चन आडनावावरून आक्षेप घेतल्याचे दिसत आहे. मात्र व्हिडिओत पुढे ती सारवासारव करताना दिसली आहे. या व्हिडिओने पुन्हा खळबळ माजली आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ? ते जाणून घेऊयात.  (aishwarya rai reaction on being called rai bachchan interview video viral in social media abhishe bachhan divorce rumour)  

अभिषेक सोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत न्युयॉर्कला गेली होती. काही दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर तिने पापाराझीसमोर प्रतिक्रिया दिली होती. पापाराझींनी त्यांना फोटोसाठी थांबवलं होतं. फोटो काढून झाल्यानंतर पॅप्सनी ऐश्वर्याला गुड मॉर्निग ग्रीड केलं. आणि मॅम तुम्ही कशा आहात? असा प्रश्न केला. या प्रश्वावर ऐश्वर्या हसली आणि तिने सगळं काही ठीक आहे. धन्यवाद, अशी प्रतिक्रिया दिली होती.

हे ही वाचा : Nag Panchami 2024: नागपंचमीचा शुभ मुहूर्त कधी, केव्हा करावी नागाची पूजा?, विधी आणि उपाय

या प्रतिक्रियेनंतर आता ऐश्वर्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने एकच खळबळ माजवली आहे. हा व्हिडिओ एका मुलाखतीचा आहे. या मुलाखतीत पत्रकार ऐश्वर्याला ऐश्वर्या राय बच्चन असे संपूर्ण नाव घेऊन प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते. पण आपलं संपूर्ण नाव ऐकूण ऐश्वर्या हैराण होते आणि फक्त ऐश्वर्या नावाने बोलण्यास विनंती करते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर पत्रकार ऐश्वर्याला राय बच्चन तुमचं आडनाव नाही आहे का? असा सवाल करतात. यावर ऐश्वर्या म्हणते, प्रोफेशनली मला ऐश्वर्या राय म्हणून ओळखले जाते. जिने अभिषेक बच्चनशी लग्न केले आहे, त्यामुळे ऐश्वर्या बच्चन हे उघड आहे, असे ऐश्वर्याने सांगितले. 

घटस्फोटाची ती पोस्ट? 

'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना एका वृद्ध जोडप्याचा हात धरून तो हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवायचा आहे? तरीही कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते,पण अनेक दशके एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग लहान-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असताना ते कसे सहन करतात? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!

अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केली. ज्यानंतर लोक आता याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत.  आणि त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 

ADVERTISEMENT

दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT