Big Boss 18: डिप्रेशन अन्... बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री तुफान चर्चेत
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar : छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस... आता बिग बॉस हिंदीचा 18वा सीझन नुकताच सुरू झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिल्पाला चित्रपटसृष्टी सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही
शिल्पाने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये केलंय काम
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar : छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस... आता बिग बॉस हिंदीचा 18वा सीझन नुकताच सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणेच यावेळीही बिग बॉसच्या घरात उपस्थित स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासे करत आहेत. अशातच आता मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर चर्चेत आली आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिनेही तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही गौप्यस्फोट केलेत.(bigg boss 18 salman khan show contestant shilpa shirodkar revealed she went in to depression after parents death)
ADVERTISEMENT
अभिनेत्री शिल्पाने सांगितले की, 2008 मध्ये तिने तिचे आई-वडील गमावले. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 8 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये सहकारी स्पर्धक गुणरत्न सदावर्ते यांच्याशी भावनिक संवाद साधताना शिल्पा तिच्या संघर्षाची आठवण करून रडताना दिसली. त्या कठीण काळात तिचा पती अपरेश रणजीत हा तिचा आधारस्तंभ बनल्याचे तिने उघड केले.
शिल्पा शिरोडकर म्हणाली, “जेव्हा 2008 मध्ये माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते. अपरेश त्याच्या करिअरमध्ये खूप चांगले काम करत होते, परंतु त्यांनी सर्व काही सोडले आणि आम्ही भारतात आलो." त्यानंतर भावूक होत शिल्पा पुढे म्हणाली, "जर अपरेशने हा त्याग केला नसता तर बँकिंग इंडस्ट्रीतील त्याची कारकीर्द अधिक उंचीवर पोहोचू शकली असती."
हे वाचलं का?
हेही वाचा : Gold Rate: सोन्याच्या किंमतीत मोठी घट! 1 तोळा मिरवून वाढवा आपली वट, पाहा आजचे भाव...
शिल्पाला चित्रपटसृष्टी सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही
यादरम्यान गुणरत्न यांनी शिल्पाच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले आणि तिच्या क्षमतेची माधुरी दीक्षित सारख्या आयकॉनशी तुलना केली. सदावर्ते म्हणाले, “माधुरीच्या लेव्हलला पोहोचू शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी तू एक होतीस. पण अचानक तू इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतलास.” यावर शिल्पा म्हणाली, "पण ही नशिबाची गोष्ट आहे आणि मला कशाचाही पश्चाताप होत नाही."
गुणरत्न सदावर्ते असंही म्हणाले की, 'भले ही तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होत नसेल पण, तुमचे चाहते तुमची पडद्यावरची उपस्थिती मिस करतात.'
ADVERTISEMENT
हेही वाचा : Bigg Boss 18: सदावर्ते जाणार जेलमध्ये? आकांडतांडव, राडा अन्… सदावर्तेंचा कहरच
शिल्पाने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये केलंय काम
शिल्पाने सिलसिला प्यार का आणि सावित्री देवी कॉलेज एंड हॉस्पिटल अशा अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. तिने पुन्हा एकदा बिग बॉस 18 मधून टीव्हीवर पुनरागमन केले आहे. दरम्यान, तिची बहीण नम्रता शिरोडकर आणि मेव्हणा महेश बाबू यांनी या शोमध्ये सहभागी होण्याच्या अभिनेत्रीच्या निर्णयाबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT