Bigg Boss 18: सदावर्ते जाणार जेलमध्ये? आकांडतांडव, राडा अन्… सदावर्तेंचा कहरच
Gunaratna Sadavarte, Bigg Boss Season 18 : बिग बॉस हिंदी सीझन 18 नुकतंच सुरू झालं आहे. दोन दिवसात बिग बॉसच्या घरात चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉस हिंदी सीझन 18 नुकतंच सुरू झालं आहे.
सदावर्तेंवर होणार बाणाने वार!
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
Gunaratna Sadavarte, Bigg Boss Season 18 : बिग बॉस हिंदी सीझन 18 नुकतंच सुरू झालं आहे. दोन दिवसात बिग बॉसच्या घरात चांगलाच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एन्ट्रीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आता बिग बॉसच्या घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यात वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करेन असा इशाराही सदस्यांना दिला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. (bigg boss season 18 first nomination task gunaratna sadavarte angry refused to go in jail exactly what happenend)
ADVERTISEMENT
कलर्स टीव्हीने नुकताच नवीन प्रोमो पोस्ट केला आहे. ज्यात घरातील पहिला नॉमिनेशन टास्क पाहायला मिळतोय. यावेळी सदस्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अन्न -पाणी सोडण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : Bigg Boss 18: "मुंबईवर मी राज करतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवार..", गुणरत्न सदावर्तेंनी फोडला राजकीय बॉम्ब
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
तर झालं असं की, आता पहिल्यांदाच बिग बॉसने नॉमिनेशन घोषणा केली आहे. त्यामुळे सगळ्या सदस्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. ज्यात करण वीर मेहरा म्हणतो, “गुणरत्न सदावर्ते वेगळाच गेम खेळत आहेत. मी त्यांना नॉमिनेट करतो.” हे ऐकून सदावर्ते भडकतात आणि करण वीरला नॉमिनेट करतात आणि “मी याला ओळखत नाही” असंही म्हणतात. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना इशारा
प्रोमोच्या शेवटी बिग बॉस करण वीर, ईशा आणि अविनाश यांना एक विशेष अधिकार देतात. घरातील एका सदस्याला जेलमध्ये बंद करण्याच्या सूचना देतात. करण वीर जेलमध्ये जाण्यासाठी सदावर्ते यांचं नाव घेतो. पण सदावर्ते हे मान्य करत नाहीत. जेलमध्ये जाण्यास ते नकार देतात. सदावर्ते नॅशनल टेलिव्हिजनवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळत आहे. “मी नॅशनल टेलिव्हिजनवर अन्न पाण्याचा त्याग करेन” असा थेट इशाराही सदावर्तेंनी यावेळी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT